*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे*

बौध्द साहित्यात व संस्कृती मध्ये वैशाख पोर्णिमेस असाधारण महत्त्व आहे कारण बोधीसत्व ते सम्यक संबुध्द असा सिध्दार्थ गौतम यांचा ८० वर्षाचा कालखंड होय.जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन अवस्था सिध्दार्थ गौतमाच्या होत.संसारातील अद्वितीय महापूरुष एकमेव म्हणून सिध्दार्थ आहेत.जगात कुणाच्याही जीवनात जन्म ज्ञानप्राप्ती आणी महापरिनिर्वाण ( मृत्यु )हे एकाच पोर्णिमेस प्राप्त झाले नाही.हजारो नव्हे तर लाखो वैशाख पोर्णिमा होवुन गेल्या परंतु सिध्दार्थ यांच्या जीवनातील तिन्ही प्राप्त अवस्थांमुळे वैशाख पोर्णिमा अडीचशे वर्षापासुन पवित्र शुध्द आणि महान म्हणून ओळखल्या गेली.केवळ याच कारणामुळे वैशाख पोर्णिमेस ” त्रिगूणी पावन पोर्णिमा ” असे ही म्हणतात.
प्राचीन जम्बूद्वीप हा बुध्दाचा होता हा इतिहास आहे.आजुनही आधुनिक भारताला बुध्द प्रणित राष्ट्रे ” बुध्दभूमी ” म्हणून ओळखतात.जवळ जवळ बाराशे वर्षे बुध्द तत्वज्ञान या देशात नांदत होते.मोठे राजे महाराजे आणि दुखी कष्टी व रंक असणारे सर्व स्तरातील मानव बुध्द शिकवणीकडे आकर्षित झाले.डाकु अंगुलीमाल, वैशालीची गणिका आम्रपाली, राजा प्रसेनजित,बिंबिसार अजातशत्रू ब्राम्हण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र अशा कुळातील सर्व लोकांचे धर्मपरिवर्तन ही अपुर्व क्रांती होय.
भगवान बुध्दाच तत्वज्ञान हे दुखमुक्तीचा मार्ग होय.काया वाचा मन शुध्दी ही अमर संजीवनी प्राप्त करुन घेण्यासाठी बुध्दकाळापासुन ते आजतागायत लाखोंची भिक्षुनिर्मिती झाली.निर्मळ शांत एकाग्र मन हे सुखी जीवनाचे सुत्र जगात प्रचलित झाले.महाप्रतापी योध्दा असणारा जो संपुर्ण प्राचीन भारताचा सम्राट राजा अशोक यांनी देखील बुध्द जीवनमार्गाची कास धरली.शस्त्राच्या बळाने नव्हे तर शांती च्या बळाने जग जिकंता येते हे कर्तुत्व सिध्द केले.बुध्द धम्म संघ या तीन रत्नांच्या नावाने आपल्या सर्व भुमीचा सातबारा बौध्दमय केला. ताकद आणि सर्व शक्तीमान असणारा राजा सम्राट अशोक अजरामर झाला.हा बुध्द तत्वज्ञानाचा विजय होय असे म्हणण्यात काहीच हारकत नाही.
गावकुसा बाहेर राहणारे व विटाळ होणाऱ्या कपाळ करंटी लोकांची नाळ पवित्र सम्यक मार्गाशी जोडणार्या,आणि राजा सम्राट अशोकाचे अनुसरण करीत कमळाप्रमाणे जीवन आणि कर्तुत्व असणारे आधुनिक भारताच्या संविधानाचे शिल्पकार , हातात आलेल्या संधीचे सोन करणारे, करोडो लोकांचे उध्दारकर्ते,देशाची राजमुद्रा, राष्ट्र ध्वज, शासन प्रशासन किंबहुना संपूर्ण संविधान बुध्द प्रणित करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखिल शांतीचे अग्रदुत असणाऱ्या बुध्दांना आपले गुरु मानले..
आणि म्हणुन जगतवंदनीय भगवान बुध्दाने शील सदाचार नितिमत्ता करुणा शांती सत्य मैत्री त्याग सदगुण विन्रमता आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व व न्याय अशा सर्व समाज व मानवहित असणाऱ्या मुल्यांचा उपदेश सतत ४५ वर्ष दिला.राजपाट सोडुन हाती भिक्षापात्र घेवुन इतिहासात अजरामर तथागत बुध्द झाले.
आणि यामुळे बुध्द महान व वंदनीय गौरवनीय आहेत.असा अलौकिक महापूरुष या पृथ्वीतला वर पुन्हा होणे शक्य नाही.केवळ त्यांचे स्मरण आणि त्यांनी उपदेशित केलेल्या जीवनमार्गाचे अनुपालन यातच मानव जातीचे सौख्य सामावले आहे.
त्यामुळे बौध्द म्हणून घेणाऱ्या सर्व लहान मोठ्या पासुन सर्वांनी वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) केली पाहीजे. *जेवढे महत्व भिमजयंतीस आहे.तेवढेच महत्त्व बुध्द जयंती स आहे* .तेव्हा *यावर्षी तथागत बुध्द यांची २५६३ वी जयंती दि.१८ मे २०१९ रविवार वैशाख पोर्णिमेस* सर्वत्र साजरी होत आहे.आपण ही आपल्या जिल्ह्यात,तालुक्यात ,शहरात,गावात,नगरात परिसरात किंबहुना आपल्या घरात प्रत्येक बौध्दांनी बुध्द पोर्णिमा अर्थातच बुध्द जयंती साजरी करावी………………………✍
भिक्खु पय्यानंद
महाविहार सातकर्णी नगर
लातुर
९७६५४८१२०१

Leave a Comment

Your email address will not be published.