काल बाबासाहेबांच्या अमेरिकेतील व लंडन मधील प्रवास वाचला आणि स्वतःच्या स्तिथी विषयी विचार करत गेलो. अमेरिकेतले पाहिले ६ महिने बाबासाहेबांनी शिक्षण/वाचन म्हणून काहीच केले नाही. एक तरुण विद्यार्थ्यांसारखे बाबासाहेब सुद्धा अमेरिकन culture ला प्रभावित होऊन सुरुवातीच्या काळात आनंद घेतला. पण एक दिवशी रात्री ३ वाजताच्या दरम्यान त्यांना लक्षात आले की त्यांच्या येथे येण्याचा उद्देश हा नाही व त्या दिवसापासून त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग करत फक्त अभ्यासाकडे लक्ष दिले व आपल्या अभ्यासक्रमाच्या दुप्पट असे एकूण ४८ कोर्सेस त्यामध्ये फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकल्या व आपली Phd पूर्ण केली. तेच अमेरिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी लंडन करीता प्रयान केले. लिव्हरपूल पासून लंडनला रेल्वेने जावयाचे होते, रेल्वेच्या तिकिचे पैसे नसल्यामुळे बिना तिकीट रेल्वे चा प्रवास केला. परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर Bsc ची परीक्षा न देता डायरेक्ट Msc ला एडमिशन मिळून घेतली. पैश्याची चणचण अजून थांबली नोहती तरी आपण बॅरिस्टर बनून वकील व्हावे व पुढे समाजकार्य करावे या महत्वाकांक्षेने ‘ग्रेस इन’ मध्ये बॅरिस्टर विषयासाठी एडमिशन घेतली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोन वेळ बडोदा संस्थान ने शिष्यवृत्ती नकारल्या नंतर, थेट सयाजीराव गायकवाड यांना भेटून आणखी १ वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर करून घेतली. पण पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुन्हा शिष्यवृत्ती मंजूर न केल्याने आपले पुढील शिक्षणासाठी आखलेल्या योजना धुळीस मिळाल्या अस लक्षात आल्यानंतर काही वेळ न वाचन करता, विश्रांती घेऊन पुन्हा मुंबईच्या परतीचा प्रवास सुरू केला.
आमच्या सारख्या असंख्य प्रथम उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यानंसाठी बाबासाहेबांचे हे अंतराष्ट्रिय प्रसंग खूप प्रेरणादायी आहे
– विकास तातड
संदर्भ –
१) डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड 1, चांगदेव भवनराव खैरमोळे
२) कोलंबिया येथे डॉ. आंबेडकरांचे कोर्सेस – रोहिणी शुक्ला