विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय!

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा तथागत बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे.
आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो.
विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण असते. अंधश्रद्धा मुळीही नसते. तिन रत्नास शरण व पंचशीलाची शपथ घेवुन
ही कार्यशाळा सुरू होते.
विपश्यना शिबिरात
१० पारमिता व पंचशील, अष्टांगमार्ग आणि मैत्रीभाव याचेही प्रशिक्षण दिले जाते.
🔸 पारमिता काय आहेत ? त्या कशा पूर्ण होतात हे अनेकांना माहीत नाही.
१० दिवसांच्या विपश्यना शिबिरात पारमिता कशा विकसित होतात हे सांगतात.
पारमिताबद्दल विपश्यना शिबिराशिवाय कुठेही मार्गदर्शन केले जात नाही.
विपश्यना शिबिरात विपश्यनाशिवाय पंचशील, अष्टांगमार्ग, मैत्रीभावना आणि पारमिता कश्या अनुसराव्या याचे सुध्दा प्रशिक्षण दिले जाते जे अन्यत्र कुठेच मिळत नाही.
हे दहा सद्गुण म्हणजे दहा पारमिता होय .
*१) शील:-*.. शील म्हणजे नित्तिमता
धम्मानुसार वाईट गोष्टी टाळणे आणि चांगल्या
गोष्टी करणे म्हणजे शील !!
*२) दान:-*.. परतफेडीची अपेक्षा न करता
दुसऱ्याच्या भल्यासाठी आवयशक तो त्याग करणे.
*३) उपेक्षा:-* म्हणजे अलिप्तता, अनासक्ति, फलप्राप्तिने विचलित न होणे. निरपेक्षपने सतत प्रयत्न करीत राहणे.
*४) नैक्षम्य : म्हणजे स्वःच्या व् इतरांचे उज्वल व्यक्तिमत्त्व निर्मितीत बाधा आणणाऱ्या ऐहिक सुखाचा त्याग.
*५) वीर्य:-* म्हणजे हाती घेतलेले काम पूर्ण शक्ति पणाला लावून पूर्ण करणे.
*६)शांति:-* म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेष संपत
नाही. द्वेष क्षमाशीलतेने संपतो.
*७) सत्य:-* म्हणजे खरे असणे. खरे बोलणे.
*८)अधिष्ठान:-* म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ़ निश्चय.
*९) करुणा :म्हणजे सर्व प्राणी व मानवाविषयी
दयाशीलता, करुणा.
*१०) मैत्री : म्हणजे सर्व
जिवमात्राविषयी बंधुभाव.
हे दहा सद्गुण तथागत बुद्धाने सांगितले आहे …
🔸 *धम्म वंदना व विपश्यना*
उत्तमनंगेन वंदे ह, धम्मच तिविध वर,
धम्मो यो खलीतो दोसो, धम्मो खमंतू त मम.
धम्म वंद्ने तिल हे एक कडवे आहे. याचा मराठी अर्थ होतो, तिन प्रकारच्या उत्तम धम्माला मी नतमस्तक होऊन वंदन करतो. माझ्या कडून काही अकुशल कार्य झाले असेल तर धम्माने मला क्षमा करावी.
बुद्धाने दिलेले उपदेश म्हणजे धम्म. धम्मची तिविध वर म्हणजे तिन प्रकारचा धम्म आहे
*१)परीयत्त्त्ती*
*२) पटिपत्त्ती*
*३) पटिवेदण*
१) परीयत्ती म्हणजे सिद्धांत,
अभ्यास धम्म साहित्याचा अभ्यास
२) पटिपत्ती म्हणजे प्रॅक्टिकल, विपश्यना ध्यान, धम्म आचरण, संस्कार ई.
३) पटिवेद्न म्हणजे अनुभूती, संवेदना जाणने व धम्म अनुभूती ई.
धम्म हा पोपटपंछी नाही. तर तो अनुभूती द्वारे समजून घ्यावा लागतो. तथागत बुद्धाने धम्म सांगितला त्याचे प्रॅक्टिकल सतीपत्ठान सूत्तात सांगितले त्यातून अनुभव घ्यायचा मार्ग सांगितला. म्हणूनच *उत्तमंगेन वंदेह धम्मच तिविध वर* धम्म वंद्नेत म्हटले आहे *मानवाच्या कल्याणाचा मार्ग विपश्यना*
🔸 निर्वाण प्राप्त करणे म्हणजे निर्मळ मनाची अवस्था प्राप्त करणे. त्यासाठी एकमेव मार्ग बुद्धाने सांगितला तो म्हणजे सतीपत्ठान. स्मृतीची प्रतिष्ठापणा करणे म्हणजे विपश्यना. हे ध्यान वैदीक पद्धतीचे नसून बुद्धांच्या उपदेशाचे आहे. ध्यान या शब्दा मुळे गैरसमज होवू देवू नये.
तथागत बुध्द हे महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. ते जगातील पाहिले आणि सर्वश्रेष्ठ तत्व वेत्ते आहेत. त्यांनीच ही *विपश्यना* विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. *विपश्यना* भगवान बुध्दांने संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत मनाच्या निर्मळतेवर अर्थात त्यासाठी *ध्यानावरच* विशेष भर दिला आहे.
*विपश्यना* ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी आणि तितकीच अवघड असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सुख आणि मन:शांती मिळवून देणारी तर्कसंगत अशी साधना आहे.
या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तींचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक समस्या दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुध्दा घडून येतो.
ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या ब्रम्हदेशात मागील २५००/२६०० वर्षांपासून परम परिशुद्ध स्वरूपात जतन करण्यात आली.
परमपुज्य सत्यनारायन गोयंका गुरुजी यांनी ही विधी ब्रम्हदेशातून भारत देशात आणून नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील आणि जगातील इतर अनेक ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवीत आहेत.
*विपश्यना शिबिरात* पहिला अभ्यास *आनापानसतीचा* (श्वासाचे निरीक्षण) व दुसरा *विपश्यना* (स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्या संवेदनाचे निरीक्षण) आणि तिसरी *मंगल मैत्री* (विश्वातल्या सर्व प्राण्यांप्रति मंगल भाव करणे) शिकवले जाते.
*आनापानसती विपश्यनाचा* प्रारंभीक भाग आहे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. म्हणून या शिबिरात सुरुवातीला *आनापानसती* शिकवून मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि सराव केल्या जाते. हा अभ्यास *विपश्यना* साधनेची पूर्वतयारीच असते. आन म्हणजे अश्वास, अपान म्हणजे प्रश्वास व सती म्हणजे सजगता. म्हणजेच येणार्या व जाणार्या श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणजेच या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते.
*विपश्यनेला* पाली भाषेत *विपस्सना* म्हटले जाते. त्यात वि आणि पस्सना असे दोन शब्द आहेत. वि म्हणजे विशेष रुपाने आणि पस्सना म्हणजे जाणणे, पाहणे किवा अनुभूती घेणे. म्हणजेच जग जसे आहे तसे पाहणे. जगाची वास्तवता समजून घेणे. सर्व बाबींना त्यांच्या मुळ गुण-धर्म-स्वभावात पाहाणे (सत्यदर्शन) म्हणजे *विपश्यना.*
या विधीत आपल्या स्वत:च्या शरीरात उत्पन्न होणार्या सर्वसामान्य, नैसर्गिक संवेदनाचे पध्दतशीर व नि:पक्षपातीपणे निरीक्षण केल्या जाते. कारण संवेदनाच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते. *विपश्यना* करतांना शरीर आणि मनाचे संपूर्ण सत्य अनुभवाच्या पातळीवर समजून घेतल्या जाते. *विपश्यनामुळे* मनाच्या खोल गाभ्यात बदलांची प्रक्रिया सुरु होते.
कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्याने तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. म्हणून *विपश्यनेच्या* माध्यमातून मनावर संस्कार करण्याचा अभ्यास *विपश्यना* शिबिरात शिकविले जातात. हा अभ्यास अत्यंत गांभिर्याने, नैसर्गिक वातावरणात आचार्याच्या मार्गदर्शनात भारतात आणि परदेशात वैज्ञानीक पद्धतीने शिकविल्या जाते.
मन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले तर तो चांगल्या कामात उपयोगी पडू शकतो.
तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी *विपश्यना* हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे *आनापानसतीचा, विपश्यनेचा आणि मंगल मैत्री* चा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने करू शकतात.
ह्या अभ्यासाने आपले जीवन किती अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. या गोष्टीची अनुभूती च्या स्तरावर जाणीव होत असते. म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व प्रज्ञा या गोष्टींचा लाभ होतो.
सत्याच्या अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत:च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. म्हणून तथागत बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग
आत्मनिरीक्षणाचा, स्वत:ला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या स्वभावाचे ज्ञान करून आपल्यामधील दोष, विकार नष्ट करता येतात. अंतर्मनातील अंधकार दूर करता येते. निसर्गाचे नियम अनुभवातून समजून घेता येते. या अभ्यासाने दु:ख, प्रक्षुब्द व ताणतणाव निर्माण करणारे कारणे शोधून त्याला नष्ट करता येतात. त्यामुळे आपले मन शुध्द, शांत व आनंदी होत जाते.
तथागत बुध्दांनी आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने आपल्या मनाच्या खोलीत शिरून सत्याचा तळ गाठला. त्यांना आढळले की, आपले शरीर अत्यंत लहान लहान परमानुंचे बनले आहे. ते सतत उत्पन्न होवून नष्ट होत असतात. म्हणजेच जीवनाच्या अनित्यतेची जाणीव होते. अनित्यतेची जाणीव झाल्याने मनुष्य कुशल कर्मे करण्याकडे वळतो. स्वतःतील दोष कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भय इत्यादी विकार दूर होऊ लागतात. उर्वरित आयुष्य दु:खात घालविण्यापेक्षा सुख आणि आनंदात जाते. असे अनेक फायदे *विपश्यना ध्यान साधनेने* मनुष्याला प्राप्त होतात.
शरीरातील प्रत्येक कण परिवर्तनीय व बदलत असल्याने ‘मी’ ‘माझा’ असे म्हणावे असे काहीच स्थिर राहात नाही, हे सत्य साधकाच्या लक्षात येते. त्यामुळे अनात्मतेचा बोध होतो. आणखी एक सत्य साधकाला स्पष्ट होते ते असे की, ‘मी’ व ‘माझे’ ची आसक्ती हीच तर दु:ख निर्मिती चे कारण आहे. ह्या सार्या गोष्टी कोणी सांगितले म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या अनुभवावरून संवेदनाच्या निरीक्षणामुळे समजू लागतात.
या अभ्यासात शिकविले जाते की, शरीरात उमटणार्या संवेदनावर कोणतीही मग ती सुखद असो, दु:खद असो की, सुखद-दु:खद असो – प्रतिक्रिया व्यक्त न करता नि:ष्पक्ष राहून केवळ निरीक्षण केल्याने दुखा:च्या आहारी जात नाही. कारण संवेदना सतत बदलत असतात. त्या कायम राहत नाही. उदय होणे, व्यय होणे हा तिचा नैसर्गिक स्वभाव असल्याचे जाणवते. म्हणून सजगता व समतेत राहिल्याने आपण दुख:मुक्त होऊ शकतो, ही गोष्ट साधकाच्या लक्षात येते.
तसेच प्रत्येक संस्कार उत्पन्न होते, लय पावते. ते परत उत्पन्न होते, लय पावते. ही क्रिया सतत सुरु राहते. आपण प्रज्ञेचा विकास करून तटस्थपणे निरीक्षण केल्यास, संस्काराची पुनर्निर्मिती थांबते. आताच्या आणि पूर्वसंचित संस्काराचे उच्चाटन झाले की, आपण दुख:मुक्तीचा आनंद उपभोगू शकतो, हेही साधकाच्या लक्षात येते.
संवेदनापासून तृष्णे ऐवजी प्रज्ञाच विकसित होते. प्रज्ञेमुळे दुखा:ची साखळी तुटते. राग व द्वेषाच्या नवीन प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत. त्यामुळे दुख: निर्माण होण्याचे कारणच उरत नाही. मनाच्या दोलायमान स्थितीत घेतलेले निर्णय ही एक प्रतिक्रियाच असते. ती सकारात्मक कृती राहत नसून ती एक नकारात्मक कृती बनते.
ज्यावेळी मन शांत व समतोल असते. तेव्हा घेतलेले निर्णय हे कधीही दुख:दायक नसतात तर ते आनंददायकच असतात. जेव्हा प्रतिकिया थांबतात, तेव्हा तणाव दूर होतात. त्यावेळी आपण जीवनातील खरा आनंद उपभोगू शकतो, याची साधकाला प्रचीती येते.
आपण सुखी व आनंदित झालो की, असेच सुख आणि आनंद दुसर्यालाही मिळावे म्हणून कामना करतो. सर्वांचे कल्याण होवो, सर्व दुख:मुक्त होवोत, हीच तर *विपश्यना ध्यान साधनेचा* उद्देश आहे. यालाच *मेत्ता भावना* म्हणजेच ‘मैत्री भावना’ म्हणतात.
तथागत बुद्धांनी या अभ्यासाद्वारे जाणले की, मनुष्याला होणारे दु:ख हे काही दैवी कारणाने होत नसते. तर त्याला जसे इतर कोणत्याही गोष्टी कारणाशिवाय घडत नाहीत, तसे दु:खाला सुध्दा कारणे आहेत.
तथागत बुद्धांनी अखिल मानवाला दु:खमुक्त होण्यासाठी चार आर्यसत्य व अष्टांगिक मार्गाची शिकवण दिली. चार आर्यसत्यामध्ये दु:ख. दु:खाची कारणे, दु:खाचा निरोध आणि दु:ख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग यांचा समावेश आहे.
अष्टांगिक मार्गामध्ये १. सम्यक दृष्टी, २. सम्यक संकल्प, ३. सम्यक वाचा, ४. सम्यक कर्म, ५. सम्यक आजीविका, ६. सम्यक व्यायाम, ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी याचा समावेश होतो. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी जसे शारीरिक व्यायाम करतो, तसेच मनाला निरोगी ठेवण्यासाठी मनाचा व्यायाम म्हणजे ही *विपश्यना* साधना होय.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जो व्यक्ती शरीराने आणि मनाने निरोगी आहे, अशा व्यक्तीला सुदृढ आणि सक्षम म्हटल्या जाते. *विपश्यना* साधनेमध्ये मानवी मन हे केंद्रस्थानी आहे. शरीरावर होणार्या प्रतिक्रिया ह्या मनातून निर्माण होतात. म्हणून मन हे निरोगी असेल तरच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
ही वैज्ञानीक साधना शिकण्यासाठी विविध भाषा, जाती, धर्म, संप्रदाय, लिंग असलेले लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यात या विधीचा मोठा हातभार लागत आहे.
आज दहशतवाद व अण्वस्त्राच्या भीतीने जगात अशांतता व अस्वस्थता निर्माण होत आहे. तेव्हा जगात शांतता नांदण्यासाठी *विपश्यना* विधीची फार मोठी मदत होत आहे. जगात ठिकठिकाणी *विपश्यना* केद्रे स्थापन होत आहेत. त्यामुळे ह्या विधीचा सार्या जगात झपाट्याने प्रसार होत आहे.
भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांनी *कैद्यांसाठी विपश्यना* अभ्यासाची व्यवस्था केली होती. त्यामुळे गुन्हेगारी जग सुधारण्यास या विधीचा उपयोग होत आहे.
शासन त्यांच्या अधिकार्यांना ही विद्या शिकता यावी म्हणून *विपश्यना* शिबिराला पाठविण्याची व्यवस्था करीत आहेत. प्रशासकीय कामे करतांना मानसिक तणाव दूर होतो. ही विधी शिकतांना तथागत बुद्धांनी सांगितलेला शील-समाधी-प्रज्ञा तसेच पंचशीलेची शिकवण मिळत असल्याने साधक वर्ग नीतीमान बनत असतो. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहत नाही. वक्तशीरपणा, प्रामाणीकपणा हे गुण साधक वर्गात वाढीस लागत आहेत.
लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत आज शिबिरे आयोजीत होत आहेत. त्यामुळे मैत्री, करुणेचे भगवान बुध्दाचे तत्वज्ञान जनमानसात रुजत आहेत. सामाजिक सलोखा निर्माण होण्यास तसेच आजच्या अनैतिक जगात माणसाला सदाचारी, चारीत्रवान, निरोगी बनविण्यासाठी या विधीचा फार मोठा हातभार लागत आहे.
*विपश्यनेचा* व्यक्तिगत दृष्टीने नियमित अभ्यास केल्याने मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार नष्ट होतात. त्यामुळे दु:ख आणि विकारातून मुक्त होवून मानवाचे कल्याण होते. तसेच सामाजिक दृष्टीने विशुद्धी, पावित्र, सदाचार, नैतिकतेचा पाया मजबूत होवून समाजविकास घडून येतो.
आज जगासमोर उपासमार, गरिबी, जातीयवाद, हिंसाचार, दहशतवाद, हुकूमशाही, युध्दजन्य परिस्थिती असे जे भयावह स्थिती दिसत आहेत, त्याला शांत करण्यासाठी भगवान बुध्दाचे समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचे तत्वज्ञान म्हणजेच *विपश्यना विधी* हेच एकमेव उत्तर आहे. म्हणून *विपश्यना* साधना ही मानवी कल्याणाचा मार्ग आहे.
आपण सर्व *विपश्यना* करा, नियमित पणे करत रहा
हा तथागत बुद्धांचा उपदेश आहे. सुत्त पिट्काच्या मज्जीम निकाय ग्रंथात सती पत्ठान सुत्तात आहे.
⛩⛩⛩⛩⛩⛩
🔸४ डिसेंबर १९५४ ला डॉ. बाबासाहेबानी रंगून येथिल भाषणात विपश्यना नाकारली काय ?
४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले. आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले. भारतात बौद्ध धम्माचे कशा प्रकारे उत्थान करता येईल यावर विविध योजना परिषदेत मांडल्या. त्यात क्र ६ चा मुद्दा असा होता की बौद्ध धम्माच्या अनुयायासाठी छोट्या स्वरूपात धम्म ग्रंथाची आवश्यकता आहे कारण धर्मांतरीत बौद्धांची ग्रंथाची गरज पूर्ण करणे आवश्यक होते. ते म्हणाले कि, पाली भाषेतील ७३ खंड वाचण्याची अपेक्षा सामान्य व्यक्ती कडुन करता येणे शक्य नाही. या ग्रंथात भ. बुद्धाच्या सामाजिक व नैतिक शिकवणुकीवर भर (Emphasis) देणे आवश्यक राहिल. ते म्हणाले की, ध्यान, मनाचे निरीक्षण व अभीधम्म यावर फार भर दिला जात आहे. या मार्गाने भारतामधे बौद्ध धम्म नवनिर्मित ग्रंथात प्रस्तुत केला तर आमच्या धेय्यात अडथळा निर्माण होईल. डॉ. बाबासाहेब English मधे काय म्हणाले,
6) I will now turn to the preliminary steps which must be taken for the revival of the Buddhism in India I mention below those that occur to me
1)The preparation of Buddhist Gospel which could be a constant companion of the convert.The want of a small Gospel containing the teaching of the Buddha is a great handicap in propogation of Buddhism in having the message of christ, contained in a small booklet.The Bible This handicap in the way of the propagation of Buddhism must be removed. In regard to the preparation of Buddhas Gospel care must be taken to emphasis (भर देणे) the social and moral teaching of the Buddh. I have to emphasis (हे मी भर देवून सांगत आहे कारण) this because what is emphasis is meditation, contemplation and Abhidhamma.(ध्यान,अनुपश्यना आणि अभीध् म्म या वरच अधिक भर दिल्या जात आहे) This way of presenting Buddhism to Indian would be fatal to our cause. (या मार्गाने जर बुद्ध धर्म भारतात प्रस्तुत केला तर तो आमच्या हेतुसाठी अडथळा ठरेल किंवा घातक ठरेल) fatal चा अर्थ अडथळा सुद्धा होतो. रस्त्यात अपघात होतो तेव्हा fatal आक्सिडेंट म्हणतात fatal शब्द त्यावेळी घातक अर्थी वापरतात. अन्यथा अडथळा असा अर्थ आहे. बरे ते काही का असू द्या, या वरून आपल्या लक्षात येईल की, त्यांनी धम्म ग्रंथ लिहताना ध्यान व अभीधम्म या वर अधिक भर द्यायचा नाही असे म्हटले, Emphasis म्हणजे भर देणे होते. भर न देणे म्हणजे नाकारने होत नाही. पुस्तक लिहताना या बाबी सुध्दा बुद्ध आणि धम्म ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनापश्यना, धम्मानुपश्यना नमुद केली आहे. सम्यक समाधी चा तर उल्लेख आहेच, ३५ वेळा Meditation शब्ददेखील आहे. अभीधम्म शिवाय बुद्ध धम्म कसा पूर्ण होवू शकेल ?
ग्रंथ लिहताना अधिक भर कशावर द्यायचा व कशावर द्यायचा नाही या बाबत डॉ बाबासाहेब बोलले, त्या वेळी म्यानमार मधे निव्वळ जंगलात जावून ध्यान करणारे भिक्कू होते तसे बाबासाहेबानी बघितले होते. ते नको होते तर धम्म प्रचारक हवे होते. नुकतेच हिंदू धर्मातून बाहेर आलेल्या समाजाला स्वाभिमानी चळवळीत (self respect movement) पक्व करायचे होते.शील आणि नैतिकता शिकवणे गरजेचे होते. लगेचच ध्यानाकडे अधिक भर दिला तर चळवळीला गती आली नसती. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ते नाकारले नाही हे स्पष्ट आहे अधिक भर न देणे not Emphasis म्हणजे नकारान्त नव्हे. not Emphasis म्हणजे अधिक भर न देने होते. नाकारले असते तर स्पष्ट पणे I do not accept किंवा I denied it असे लिहले असते, ते स्पष्टवक्ते होते. हा मुद्दा पुस्तकातील मसुदा कसा राहील या वर होता. लेखक एखाद्या मुद्द्यावर अधिक भर न देता मुद्दा कायम ठेवत असतो तसे बाबासाहेब म्हणाले. सतीपठ्ठान सुत्त डॉ. बाबासाहेब कसे काय नाकारतातील ? तो तर बुद्धाचा शोध आहे. सुत्तपीटकाचा अविभाज्य अंग आहे.
विपश्यनाला खूप महत्व द्या असे आम्ही सुद्धा म्हणत नाही आमचे म्हणणे असे की तो बुद्धाचा सतिपठ्ठान सूत्तातिल उपदेश आहे हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. त्यावर टीका करू नका, टिंगल करू नका, द्वेष करू नका.
संवर्धन करा. तुम्ही विपश्यना करा की नका करू पण धम्म उपदेशाची चुगली करून गैरसमज पसरवू नका.
Contemplation म्हणजे विपश्यना असा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्द कोशात (लेखन आणि भाषणे खंड १६) मध्ये सांगितला आहे Contemplation म्हणजे विपश्यना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात बाबासाहेबानी खालील प्रमाणे धम्म म्हणजे काय या प्रकरणात लिहले आहे.
Herin a monk abides contemplating the body as body, (कायानुपश्यना ) strenuous, mindful and self possessed, having overcome both the bankering and discontent common in the world
He abides contemating the feelings as feeling (वेदनानुपश्यना )
He abides contemplating the mind as mind ?(चित्तानुपश्यना)
He abides contemating the ideas as ideas ,(धम्मानुपश्यना )
डॉ. बाबासाहेबांच्या इंग्रजी मेमोरेन्डम ४ डिसेंबर १९५४ चा अर्थ नीट समजून न घेता बाबासाहेबानी विपश्यना नाकारली म्हणून ओरड केली जाते. सामान्य माणसाची दिशा भूल केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आनापानचा अर्थ, ‘Inhaled, extended, breath, inspiration, respiration’ असा पाली डिक्शनरीत (खंड १६) सांगितला आहे. ते स्वतः ध्यान करायचे असा उल्लेख चांगदेव खैर्मोडे लिखित चरित्र ग्रंथात आहे. असे सर्व असताना ते ध्यान विरोधी होते, विपश्यना विरोधी होते असा अपप्रचार केला जातो या अशा लोकांपासून सावध रहा.
विपश्यनेचा इतका स्पष्ट उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथात केला असूनही त्यांनी विपश्यना नाकारली असा अप प्रचार करणे समाजाची दिशाभूल करणे आहे.
शब्दांचे अर्थ :-
१) Emphasis :- (giving) special importance or attention (एखाद्या गोष्टीकडे दिलेले) विशेष लक्ष किंवा (तिला दिलेले) विशेष महत्व,प्राधान्य,भर.
(Oxford English-English-Marathi Dictionary Page No,452)
२)आनापान :- Inhaled,extended breath, inspiration, respiration (आन +अपान)
(पाली शब्द कोश खंड १६ लेखक डॉ बाबासाहेब आम्बेडकर )
३) विपस्सको हा पाली शब्द आहे विपश्यनाचे क्रियापद त्याचा इंग्रजी अर्थ खुद्द डॉ बाबासाहेब अम्बेडकरानी दिला तो असा Contemplating, endowed with
(पाली शब्दकोष Volume १६ लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर )
या वरून आपल्या लक्षात येईल की डॉ बाबासाहेबानी विपश्यना नाकारली नाही. तर स्वीकारली आहे.
सम्यक समाधीचा उपदेश म्हणजे काय ? मनात वाईट विचार येवू न देणे आलेले बाहेर काढणे. हे कसे साध्य करायचे ?? केवळ वंदना म्हटल्या ने शक्य आहे काय ? मुळीच नाही तर या साठी सतीपत्ठान सुत्त हे प्रॅक्टिकल आहे. ज्यामुळे मन निर्मळ होईल अर्थात सम्यक समाधीचा उद्देश पूर्ण होईल. बौद्ध धम्मातील सम्यक समाधी म्हणजे हिंदू समाधी नव्हे, बुवाबाबाची नव्हे. बुद्धांच्या विपश्यना ध्यान पद्धती मधे उपासक सतत जागरूक असतो. मनावर पहारा देत असतो. हे ध्यान एकदा अवगत झाले की केवळ बसून विपश्यना करायची नसून २४ तास करू शकता. आपण काय करतो याची सतत जाणीव ठेवणे. याला स्मृतीची प्रतिष्ठापणा म्हणजे, सतीपठाण सुत्त म्हणतात आणि हे विशिष्टपणे केल्या जाते म्हणून विपश्यना म्हणतात.
विपश्यना शिबिरात शील पालन अनिवार्य असते, १० पारमितांचा अभ्यास सुद्धा आपल्याला समजतो जो कुठेच समजावीले जात नाही. मैत्री भावना व अष्टशील तसेच बुद्धाचे उपदेश प्रवचनात सांगितल्या जाते. विपश्यना शिबिर म्हणजे धम्म उपदेशांची प्रयोग शाळा आहे दूसरे तीसरे काही नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?