“हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही. हे आमचे कार्य नाही. स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. यापलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मांतर करुन जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणुन आमच्या अंगावर घ्यावा? त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणुन द्यावी? हिन्दु समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे असा कोणीही आपला गैरसमज करुन घेऊ नये.”
तेव्हा बौद्धजनहो, आपली वाटचाल ओळखा व त्यानुसारच कार्यप्रवण राहू या. प्रत्येकजागी नाक खुपसणे हे आजमितीस आपल्या हितार्थ नाही याचे आपण भान जोपासले पाहिजे.
बौद्धांनी का म्हणून आपली वैचारिक आहुती द्यायची?
बहुजनांच्या नादी लागूनच आजचे देशातील चित्र आपण आपल्याही बोकांडी मारून घेतले आहे. त्यांचे धार्मिक मुद्दे त्यांनाच निपटवू द्या. आपण आपल्या जीवन मरणाच्या (शिक्षण, नोकरी, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी, महागाई इत्यादी मूलभूत) प्रश्नांकडे लक्ष पुरविले पाहिजे. ते आपण आपल्या मनमस्तिष्कात कोरून ठेवले पाहिजे. पुढचे शे-दोनशे वर्षे तरी तोच आपला अग्रक्रम असला पाहिजे. आपल्या चळवळीचे ध्येय कोणते, आपले कर्तव्य कोणते? हे बाबासाहेबांनी फार पूर्वीच दिशानिर्देशित करून ठेवले आहे.
जयभीम !