आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक, कवी बुध्दवासी प्रतापसिंग बोदडे यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम गुरुवार दि. ९ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गायक, आंबेकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रतापसिंग दादाचे चाहते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर,
भीमराज की बेटी मै तो..,
या सारखी अनेक आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्धीचा उच्चांक मोडणारी गाणी त्यांच्या लेखणीतून अवतरलीत.
लोक कवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य, ज्यांनी आंबेडकरी प्रबोधन चळवळीच्या पिढीचे नेतृत्व केलं. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी प्रबोधनकारी सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झालीय..
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आनंद शिंदे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व गायक दिवंगत प्रतापसिंगजी बोदडे मामाजी यांचा जलदान विधीचा कार्यक्रम दि 9 जून रोजी मुक्ताईनगर येथे आहे
Posted by Sumedh Jadhav on Monday, 6 June 2022