“जातीमुळे अपमानित शोषित तुडवलेल्या समाजाच्या स्वातंत्र्यचा जाहीरनामा म्हणजे २२प्रतिज्ञा”
२२प्रतिज्ञा आचरण प्रचार हि प्रत्येक बौद्धांची जबाबदारी आहे.
मला जेव्हा पासून थोडी बहुत समज आली तेव्हा पासून धम्मप्रचार करावा व धम्मप्रचारक म्हणून जीवन जगावे असे मनात पक्के ठरत गेले. हा काय करतो किंवा तो काय करतो, या संघानेचे हे चुकते ते चुकते, या संघटनांनी असे करायला पाहिजे तसे करायला पाहिजे याचा काथ्याकूट करण्यास वेळ घालवला नाही. सोबत असलेले सहकारी, असेल तशी परिस्थिती व बुद्ध धम्म प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संघटना याना सहकार्य करून २२ प्रतिज्ञा अभियान प्रचाराच्या वाटचालीस नांदेड येथून सुरवात केली. २२ प्रतिज्ञा अभियानाची सुरवात दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झाली. या अभियानाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
(संदर्भ – “२२ प्रतिज्ञा अभियान मानव मुक्तीचे अभियान” या पुस्तकातून साभार, लेखक अरविंद सोनटक्के )
जय भीम, जय २२ प्रतिज्ञा अभियान