*वेगवेगळ्या भाषेतील विपश्यनेचा अर्थ
*_Meditation – English_*
*_ध्यान – हिंदी, मराठी_*
*_विपश्यना – पाली_*
विपश्यना हा पाली शब्द आहे त्यास मराठीत ध्यान म्हंटले जाते व इंग्रजीत Meditation. आपल्या Buddha & His Dhamma या इंग्रजी पुस्तकात बाबासाहेबांनी Meditaion हा शब्द वापरला आहे, त्याचा पाली अर्थ विपस्सना असाच होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वता पाली शब्दकोश लिहिला आहे जो सरकारने १६ वा खंड म्हणून प्रकाशित केला आहे. सुज्ञ अभ्यासकांनी तो अभ्यासावा.
बाबासाहेबांनी त्रिपिटिकाचा अभ्यास करूनच *बुद्ध आणि त्यांचा धम्म* हा महान ग्रंथ आपल्याला दिला. त्रिपिटिकाच्या सुत्तपिटिकात मज्झिमनिकाय ग्रंथात सतिपठ्ठान सुत्त आहे. सुत्त म्हणजे भगवान बुद्धांनी केलेले उपदेश. सतिपठ्ठान सुत्तामध्ये कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना व धम्मानुपश्यनेबद्दल सविस्तरपणे दिलेले आहे. सतिपठ्ठान सुत्त हे मुळ त्रिपिटिकामधील आहे. भन्ते सोण मोगलीपुत्त तिस्स, भन्ते उत्तर हे स्थविरवादी मुळ पिटकाला माणनारे होते. त्यांनी हे सुत्त श्रीलंका व ब्रम्हदेशात प्रसारित केले. बाबासाहेबांनी सतिपठ्ठान सुत्ताला कधी विरोध केलेला नाही. ज्यांना विपश्यनेचा खोलवर अभ्यास करायचा असेल त्यांनी ह्या सतिपठ्ठान सुत्ताचा गांभीर्याने अभ्यास करावा.
भगवान बुद्धांना ध्यान साधनेतुनच म्हणजे विपश्यनेतुनच बोधी प्राप्त झालेली आहे. ( _सुत्तपिटक़ातील मज्झिम निकायाच्या सुत्तात याचा उल्लेख आहे_ ). भगवान बुद्धांचा धम्म एकमेव असा आहे की ज्यात *Theory【 परियत्ती ( सिद्धांत )】 व Practical 【पटिपत्ती ( प्रात्यक्षिक)】*दोन्ही आहेत. परियत्ती व पटिपत्ती या शब्दांचे अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्दकोषात दिलेला आहे ( _डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड १६_ ). बुद्धांनी फक्त उपदेश केला असता तर सर्व राजे आणि रंक त्यांच्या मार्गावर आंधळेपणे चालले असते का ? त्रिपिटिक व सर्व धममावरील ग्रंथसंपदा ही Theory आहे व विपश्यना Practical. त्यामुळे Theory व Practical दोन्ही महत्वाचे आहेत. शिलावर आरूढ होण्यासाठी विपश्यनेशिवाय दुसरा मार्ग नाही. जोपर्यंत आपण शिलावर आरूढ होत नाहीत कमीत कमी पंचशीलाचे कठोर पालन करत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने बौद्ध नाही आणि हा इतका गंभीर विषय आपले बांधव कीती सहज ( Easily ) घेतात. फक्त उपदेशाने बौद्ध झाले असते तर गेल्या ६० वर्षात भारत बौद्धमय झाला पाहीजे होता. तृष्णेतून बाहेर पडा, असे फक्त म्हटल्याने तृष्णेतून बाहेर पडले असते तर ह्या देशात कधीच दुःख नसते. कारण सर्वच धर्म तृष्णा, मोह माया यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. नुसत्या उपदेशाने काहीही होत नाही.
प्रत्येक जण बाबासाहेब किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध नसतात. बाबासाहेबांचा लढा मानव मुक्तीचा होता. महामानव दुःख करत बसत नाहीत. तर दुःख मुक्तीचा मार्ग स्वतः शोधतात आणि दुसऱ्यांना दाखवतात. बुद्धाचे तत्वज्ञान आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म वेगळे असू शकत नाहीत. जगातील सर्व बौद्ध देशांमध्ये विपश्यनेला मान्यता आहे. थेरवादी, (हीनयान) असो महायान असो वा तंत्रयान कींवा अजुन कुठले पंथ असो. आपल्याकडे त्यात उगाच वाद घातला जातो असं मला वाटत. कोणी सांगितलं म्हणून करावं किंवा नाही करावं, ह्या पेक्षा अनुभूतीद्वारे शिकावं हीच तथागताची शिकवण आहे.
ज्यांना विपश्यनेचा खरा अर्थ कळालेला नाही अशी काही प्रतिष्ठित लोकही त्यांच्या अज्ञानामुळे ईतरांचा बुद्धिभेद करतात, निरर्थक अशी उदाहरणं देऊन, तेव्हा आपला समाज का मागे राहिला ह्याचे उत्तर मिळते.
विपश्यना म्हणजे नेमके काय आहे ह्याचा स्वत: अनुभव न घेता बरीच मंडळी झटपट प्रसिद्धीच्या तृष्णेसाठी विपश्यनेला विरोध करुण धम्मद्रोह करत आहेत व धम्म प्रचारात अडथळा आणत आहेत. अविद्या व तृष्णा ही सर्व समस्या आणि दुःखाचे २ मुळ आहे असे तथागतांनी सांगीतलेले आहे आणि इथेही तेच कारण आहे. अविद्या व झटपट प्रसिद्धीच्या तृष्णेमुळेच हे धम्म बंधुच विनाकारण विरोध करत आहेत. जगातील बऱ्याच धर्मातील अंधश्रद्धा आणि अवैज्ञानीक गोष्टीच्या मनावर झालेल्या संस्काराने पूर्वग्रह करुन, बऱ्याच वेळा लोकांचे विपश्यनेबद्दल गैरसमज होताना दिसतात. ह्या विरोधकांना वाटते विपश्यना म्हणजे शांत पडून राहणे, कुठल्या अनैसर्गिक शक्तीची आराधना करणे, कर्मकांड करणे, मंत्र-तंत्र बोलून आत्म्याला बोलावणे, अंधश्रद्धेच्या डबक्यात डुबकी मारणे वैगरे-वैगरे. विपश्यनेमुळे संघर्षाची ताकत कमी होऊन मनुष्य निष्क्रिय बनतो हा सर्वात मोठा गैरसमज. परंतु याउलट विपश्यनेचे फायदे अतिशय सकारात्मक आहेत. खरे तर विपश्यना शिबिरांमध्ये तथागतांच्या पंचशील, अष्टांग महामार्गाशीवाय (शील, समाधी आणि प्रज्ञा ) व १० पारमिता हे सोडुन अन्य काहीच शिकवत नाहीत. प्रज्ञा, शील आणि करुणा ह्या कठीण शब्दांची व्याख्या स्वतःच्या अनुभवाने सिद्ध करण्याचा मार्ग विपश्यना आहे. ज्यामुळेच समता, बंधुत्व आणि न्यायचे जग निर्माण होणार आहे. शिलावर आरूढ होऊन धम्म अनुसरणामध्ये कशी प्रगती करता येईल याचे Practicle घेऊन Practice करुण घेतल्या जाते. विपश्यना म्हणजे नैसर्गिक रीत्या स्वत:बद्दल जाणून घेणे. स्वत:च्या शरीर व महत्वाचे म्हणजे मनावरील सर्व प्रकारचे विकार दूर करणे म्हणजे विपश्यना. विपश्यनेमुळे काम करण्याची ऊर्जा आणि एकाग्रता वाढते. मनुष्याचे मन संयमित झाल्यामुळे कार्याची कुशलता तसेच Productivity वाढते. परंतु ह्या सर्व गोष्टी स्वत: अनुभव घेतल्याशिवाय कळत नाहीत.
हे विरोधक सांगतात की बाबासाहेबांनी विपश्यना स्वीकारली नाही, परंतु त्याचा एकही ठोस Reference देऊ शकत नाहीत. बऱ्याच वेळा बाबासाहेबांचे Reference अर्धवट बुद्धिने समजून घेऊन कींवा बुद्धीचा वापर न करता हे विरोधक बाबासाहेबांच्या मागे लपताना दिसतात, कारण दूसरे कुठलेही ठोस कारण ह्यांच्याकडे नसते. याचा अर्थ असा होतो की हे लोक पंचशील, अष्टांग महामार्ग आणि दहा पारमिता या तिन मुळ शिकवणी सुद्धा अंधश्रद्धेने स्विकारत आहेत. विपश्यनेचा स्वत: अनुभव न घेता स्वत:ला बुद्धिजीवी समजणारे धम्मबंधुही प्रतीत्यसमुत्पादाचा खोलवर अर्थ सहज लक्षात न आल्या कारणाने नकारात्मक लिखान करुन धम्म प्रसारात अडथळा निर्माण करत आहेत. *बुद्धघोषासारख्या महान धम्मसूर्यालाही प्रतीत्यसमुत्पादाचा अर्थ लवकर उमगला नव्हता.* त्यामुळे अश्या लोकांनी गोंधळून जाऊ नए तर थोडे स्पीड कमी करावे लागेल. त्यानंतर अभ्यास व स्वअनुभवामुळे ह्या गोष्टी लक्षात येतील.
वास्तविक पाहता विपश्यना हा वादाचा विषय नाहीच. धम्म म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर आहे. सामाजिक आणि नैतिक गोष्टींना विशेष प्राधान्य देणारा *भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म* हा ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्याला दिला. त्यात कुठेही त्यांनी ध्यान, विपश्यना कींवा अभिधम्मातील ज्ञानाविषयी नकारात्मक भूमिका मांडलेली नाही, याउलट याविषयी सकारात्मकच लिहिले आहे. *बुद्ध आणि त्यांचा धम्म* ह्या ग्रंथाच्या नावातच सर्व आले. बाबासाहेबांनी कुठला नविन पंथ स्थापन केलेला नाही. त्यामुळे जी मंडळी सांगतात की बाबासाहेबांचा बुद्ध वेगळा आहे त्यांच्या या बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही. बाबासाहेबांच्या कुठल्याही लिखानात त्याचा साधा उल्लेख कींवा क्लू सदृश्य ही काही नाही. सदर ग्रंथामध्ये ३५ वेळा Meditation चा उल्लेख त्यांनी केलेला आहे. *सदर ग्रंथातील खंड १, भाग ७ मधील ‘बुद्धाने काय स्वीकारले ?”* हे प्रकरण वाचले की लक्षात येईल की, *_चित्तशुद्धी हे धम्माचे सार होय. सुज्ञ वाचक जाणु शकतो की धम्माचे पालन/अनुसरण हा मनाचा विषय आहे._*
बाबासाहेबांच्या लिखनात आणि भाषणात बऱ्याच वेळा चित्त शुद्ध करणे गरजेचे आहे आणि ती पहिली पायरी आहे, असे उल्लेख आलेले आहेत. *बुद्ध आणि त्यांचा धम्म* ग्रंथात धम्म म्हणजे काय ? यात बाबासाहेब, बुद्धांनी शोधलेल्या ५२ प्रकारच्या चित्तवृत्ती व १२१ प्रकारच्या चित्त प्रकाराबद्दल सांगतात. ह्या विरोधकांनी याचा अर्थ नक्की काय लावावा ? चित्त शुध्द करणे म्हणजे काय ? चित्त शुद्ध करायला कुठल्या डॉक्टर कडे जायचे ? की कुठला मांत्रिक पकडायचा ? प्रिय विरोधकांनो याचा शोध घ्या आणि वेळ वाया घालवुनही उत्तर नाही सापडले तर एकदा स्वतः विपश्यनेचा अनुभव घ्या. *_जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुकूल वा प्रतिकुल परीस्थितीत आपले चित्त शुद्ध व स्थिर राखणे फार महत्वाचे आहे. आणि चित्ताच्या शुद्धी व स्थैर्याकरीता ध्यान, विपश्यना हाच त्यावरील एकमेव मार्ग आहे._
* विपश्यनेमुळेच चित्त शुद्ध होते, मनावरचे अकुशल संस्कार, अकुशल लेप दूर होऊन मन/चित्त योग्य दिशेने आणि कुशल कर्मे करवते. विपश्यना म्हणजे चमत्कार नाही. विपश्यना म्हणजेच संपूर्ण बुद्ध धम्म असेही नाही, तर ते चित्त कुशल करण्याचे प्रभावी आणि एकमेव Tool आहे. श्रुत प्रज्ञा, चिंतन प्रज्ञा आणि भावना प्रज्ञेमधील फरक फक्त विपश्यनेमुळेच समजतो. मी स्वत:ही तुमच्यासारखाच ह्याचे त्याचे ऐकून विपश्यनेला विरोध करायचो. त्यानंतर स्वत: अनुभव घेतल्यानंतर डोक्यात प्रकाश पडला. तुम्हीही स्वतः अनुभव घेऊन समजली तर स्वीकारा अन्यथा त्याबद्दल नकारात्मक लिखान करुण धम्मद्रोह करू नका अशी एक विनंती आहे. माझ्यासारख्या Skeptical लोकांनी स्वत: अनुभव घेऊन पहावा त्यानंतरच आपले मत बनवावे. _कारण या विरोधकांचे मत म्हणजे लबाड लाडंग्याच्या अवस्थेप्रमाणे आहे जो म्हणतो ‘आपके अंगुर खट्टे है।’ अरे ज्यांनी कधी द्राक्षे प्रत्यक्ष खाल्लेच नाही तो फक्त इतरांच तोंड पाहुन ऐकीव गोष्टीवर निष्कर्ष काढत आहे. त्यासाठी प्रत्यक्ष दहा दिवस शिबिरात हजर व्हा व स्वत: प्रयोग करून नंतर चांगले किंवा वाईट ठरवा अशी आपणांस नम्र विनंती._
*_एही पस्सिको (या आणि पहा )_*
*”स्वाद चखना जरुरी है, जब तक नहीं चखोगे, समझोगे कैसे भाई ?”*
बाबासाहेबांच्या मागे लपणाऱ्यांसाठी ते ध्यान करत होते याचे व याविषयीचे त्यांचे काही Refernces…..
*१.* *_Little facets known about Dr. Babasaheb Ambedkar_*
*By – Nanak Chand Rattu*
Chapter 3
Daily Routine
Page no. 60
*After the morning ablution he would say his prayers, standing before best of bhagvan buddha. Then medaitaion for a while and a little exercise in variation.*
*२.* *सारनाथ, कुशीनारा येथील बौद्ध स्थळांवर गेले असता त्यांनी ध्यान केलेले लिखीत स्वरुपात आहे.*
_बाबासाहेब सारनाथला गेले होते तेंव्हा बोधीवृक्षाखाली अर्धा तास ध्यानाला बसले होते._
_गाझियाबाद अलीपुर रोड जाणारा रस्ता, दिल्ली युनिवर्सटी लॉन वैगरे ठिकाणी बाबासाहेब १-२ तास ध्यानाला बसत. कधी कधी रिडींग रोडवरील बुद्ध विहारामध्ये ते जात आणि अर्धा तास ध्यानमग्न बसून नंतर प्राथना करुण परत घरी येत._
*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड-११, पान क्र. १४०’१४३_*
*_खंड – १२, पान क्र. १०६_*
*By – आयु. चांगदेवजी खैरमोडे*
*३.* *Writings and Speeches of Ambedkar, vol. 18, part 3, page 441.*
धमे १९५५ वैशाख पौर्णिमा, नालासोपारा येथील बाबासाहेबांचे भाषण.
*सम्यक स्मृती :- शरीरातील सुख-दुखवादी संवेदनांचे वारंवार अवलोकन करणे. ( हे विपश्यनेतच केले जाते )*
*४.* *_बुद्ध आणि त्यांचा धम्म_*
तृतीय खंड
भाग चौथा
– निब्बाणावरील प्रवचने
– धम्मावरील प्रवचने – सम्यक दृष्टी
*५.* *_बुद्ध आणि त्यांचा धम्म_*
चतुर्थ खंड
भाग तीसरा,
धम्म म्हणजे,
१ – कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना व धम्मानुपश्यना.
८ – विवेकशीलता आणि एकाग्रता,
९ – जागृतता कळकळ आणि धैर्य,
*६.*
*_बुद्ध आणि त्यांचा धम्म_*
*पृष्ठ क्र. १७७*
*७.* *_Writings and Speeches of Ambedkar, vol.-3, chapter 18, Buddha or Karl Marks Page – 461-462._*
*८.* *_Writings and Speeches of Ambedkar, vol – 16, Pali dictionary, Page No. 415._*
*९.* *Essense of buddhism*
*By – Pro. P lakshmi narasu*
_या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब स्वत: म्हणतात की, हा ग्रंथ जे वाचतील त्यांचे नुकसान होणार नाही याची मला खात्री आहे._
सदर ग्रंथाचा अभ्यास केल्या नंतर लक्षात येते की बाबासाहेबांनी विपश्यना नाकारायचा प्रश्नच उद्भवत नाही.
*सुज्ञ वाचकांनी हा ग्रंथ अभ्यासावा. तिथेच हा वादाचा विषय मार्गी लागेल*
*१०.* *बाबासाहेबांनी ज्या ग्रंथाची प्रशंशा केलेली आहे त्या मिलिंद प्रश्न ग्रंथात भन्ते नागसेनने राजा मिलिंद याला सम्यक समाधीचे २८ फायदे सांगीतलेले आहेत. ( मिलिंद प्रश्न. पृ. क्र. १७३ )*
*११.* *Without knowledge there is no meditation,without meditation there is no knowledge: he who has knowledge and meditation is near into Nibbana.*
*_- Buddha & His Dhamma page no.426 column 16_*
_आज सर्वच धर्म आणि संप्रदायाच्या लोकांना विपश्यना मार्ग आकर्षित करत आहे. असे घडत आहे कारण, मन कुठल्याही धर्म कींवा संप्रदायाशी निगडीत नाही. विपश्यना मनाला समजून घेऊन त्याचा जीवनात कसा वापर करावा हे सांगते, कुठल्याही धर्माचे कींवा संप्रदायाचे लेबल न लावता कुणीही विपश्यना करू शकते. अश्या परिस्थिती मध्ये जरी आकलन झाली नाही तरी हरकत नाही, परंतु त्याचा विरोध करुण धम्मद्रोह करून धम्म प्रसारात कमीत कमी अडथळा तरी आणु नए हीच विनंती. कारण हा असाच धम्म द्रोह करत बसाल तर भारत बौद्धमय करणे तर दुरच, आपण आपल्या पुर्वाश्रमीच्या महार समाजालाही बौद्ध बनवु शकणार नाही. विचार करा व शिलावर आरूढ होऊन धम्म धारण /अनुसरण करा…_
*अविनाश पवार*