महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यापैकी एक असे मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा !

.*_¶ सम्राट अशोकांनी स्तूप निर्माण करताना जे वास्तूशास्त्र आणि तंत्र वापरले होते. त्याचाच अभ्यास करून मुंबईतील बोरीवली पश्चिमेला असलेला गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडाची निर्मिती करण्यात आली आहे.*
.*_¶ याचे वैशिष्ट्य असे कि हा पॅगोडा निर्माण करताना लोखंड, सिमेंट इ. कुठच्याही गोष्टीचा वापर न करता, केवळ आतून जोडण्यात आलेल्या (इंटरलॉकिंग) पद्धतीने हजारो दगडांचा वापर करून उभारला आहे.*
.*_¶ ज्यामुळे कसलाही क्षय न होता वर्षानुवर्ष हा सुस्थितीत राहील. दगड परस्परांत गुंफून हा घुमट बनविण्यात आला आहे. या घुमटावर आकाशात झेपावणारा उंच मनोरा आहे. त्या साठी २५ लाख टन जोधपुरी दगड वापरण्यात आले आहेत.*
.*_¶ या प्रमुख पॅगोडाच्या उभारणीस सुमारे ११ वर्षे लागली असल्याचं सांगण्यात आलं.*
.*_¶ एकुण १२ एकर जागेत उभारण्यात आलेल्या ३६० फूट उंच अशा या ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये ९० फूट उंच आणि २८० फूट व्यासाच्या ध्यानकक्षाची (घुमट) निर्मिती करण्यात आली आहे.*
.*_¶ येथे एकावेळेस जवळ पास ८,००० पेक्षा जास्त साधक बसून ध्यानधारणा करू शकतात. सदर पॅगोडा हा विजापूर येथील प्रसिद्ध “गोल घुमटाच्या” तीनपटीनं मोठा आहे.*
.*_¶ येथे भगवान गौतम बुद्धांचा जीवनक्रम दाखविणारे अतिशय देखणे कलादालन आहे.
.*_¶ तेथे बुद्धांच्या जीवनक्रमांवर आधारित अतिशय रेखीव असे छायाचित्रांचे प्रदर्शन आहे.
.*_¶ पॅगोडा संपूर्ण होण्यास अजुन काही वर्ष लागण्याचा अंदाज आहे.*
.*_¶ पॅगोडाच्या दरवाजांवर असलेल्या बर्मा टीकवुडवर गौतम बुद्धांच्या जीवनावरील चित्रे काढण्यात आलेली आहेत.
.*_¶ शिवाय पॅगोडामध्ये एक आर्ट गॅलरी आहे. त्यामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनावरील अनेक सुबक व भव्य चित्रांचं प्रदर्शन आहे.
.*_¶ प्रमुख पॅगोडाच्या उत्तरेस ९० फूट उंचीचा एक छोटा पॅगोडा उभारण्यात आलेला आहे.*
.*_¶ तर पूवेर्स अशोकस्तंभ असून त्याच बाजूला आणखी एक छोट पॅगोडा उभारण्यात आला आहे.*
.*_¶ पॅगोडा संकुलासाठी ‘एस्सेलर्वल्ड’ने जमीन दिलेली आहे. जमिनीची किंमत वगळता पॅगोडावर ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. संपूर्ण संकुलाचं काम पूर्ण होण्यासाठी नंतर ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.*
.*_¶ त्यात पॅगोडाच्या परिसरात सेमिनार व कॉन्फरन्स रूम बांधणे, सभागृह, ऑडिओ-व्हिज्युअल गॅलरीज, बगीचा इत्यादींचा समावेश राहील.*
.*_¶ परदेशातून आणलेल्या खास सोनरी रंगानं पॅगोडाचं बाह्यांग आणि कळस रंगविण्यात आला आहे.
.*_¶ परिक्रमासाठी दुमिर्ळ अशा संगमरवरी दगडांचा मार्ग बनविण्यात आला आहे. त्यामुळे त्यावरुन अनवाणी चालणं सोपं झालं आहे.
.*_¶ शिवाय पॅगोडा परिसरात लोकांना आरामात बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?