डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग..!

एकदा असे झाले दुपारचे १२ वाजले असतील .
बाबासाहेबांना भूक लागली होती,
त्यांनी अभ्यासिकेतून आवाज दिला ,
अरे बालम , मला भूक लागली , रमाला जेवण
पाठविण्यास सांग ‘
‘ होय बाबा ‘ बालम म्हणाला.
अभ्यासाच्या तल्लीनतेत असेच अनेक तास
निघून गेले . परत पोटाने तक्रार सुरु केली.
बाबासाहेबांनी पुन्हा साद घातली .
‘ बालम , अरे जेवण पाठव ना ‘
‘ बालम ! हा आलोच बघा जेवण घेवून ‘ बालम
आदबीने म्हणाला .
पुन्हा बाबासाहेब अभ्यासात गर्क झाले.
रात्री केव्हा तरी १० /११ च्या सुमारास
बाबासाहेबांना पुन्हा जाणीव
झाली कि आपण अद्याप जेवण केलेच नाही .
त्यांनी तिसऱ्यांदा बालामला जरा रागातच
आवाज दिला .
‘ तू अद्याप जेवण का पाठविले नाहीस ?’ असे
म्हणत ते पहिल्या मजल्यावरील
अभ्यासिकेमधून जिना उतरून तळमजल्यावर
आले. तिथे अगोदर पासून
बसलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन
बाबासाहेबांनी तडक हॉटेल गाठले.
हॉटेलमध्ये सर्वांसह जेवण , अनेक प्रश्नांवर
चर्चा करून परत अभ्यासिकेत आले व
अभ्यासात गुंग झाले.
बरेच दिवस या प्रसंगाचा गुप्त खल
राजगृहावर चालला होता ,
कि बाबासाहेबांना कोणी सांगावयाचे
कि ज्या दिवशी रमाईने जेवण दिले नाही,
त्या दिवशी तुम्हीच नव्हे तर रमाई सह
यशवंत, मुकुंद सर्व उपाशीच झोपले होते,
कारण ……
कारण जगाचे अर्थशास्त्रज्ञा च्या ,
भारतातील दलितांच्या ,अस्पृश्यांच्या
भाग्यविधात्याच् या , तमाम
गोरगरिबांच्या चुली पेटविणाऱ्या ,
ऐश्वर्याच्या देवतेनेही ज्याच्या घरी पाणी भरावे
अशी ज्यांची विद्वत्ता , त्या ज्ञानी ,
प्रज्ञावंताच्या महान विचारवंतांच्या ,
निष्कलांकित चारीत्र्यावंताच
्या घरची त्या दिवशी चुलच पेटली नव्हती .
बाबासाहेबांच्या कानावर
हि परिस्थिती घालणारा धाडशी कोणी हि नव्हता तेव्हा रमाईच्या माहेरचा एक
नातेवाईक, सासरा म्हणून उभा करण्यात
आला . प्रथम तर तो तयारच होईना .
बाबासाहेबांच्या नावानेच त्याचे पाय
लटपटू लागले . अनेक रंगीत
तालमी झाल्या परंतु त्याची बोबडीच वळत
असे. शेवटी कसातरी तो सद्गृहस्थ हो –
ना करता तयार झाला . एकदा बाबासाहेब
अभ्यासिकेत असतांना त्या सासऱ्यास तेथे
अक्षरशः ढकलून पाठविण्यात आले. त्याचे
पाय लटपटत होते. एकदाचा आवंढा गिळून
त्याने अभ्यासिकेत तल्लीन
झालेल्या बाबासाहेबांना हाक मारली.
‘ बाबासाहेब ‘
बऱ्याच वेळानंतर पुस्तकातून मान वर करून
बाबासाहेब म्हणाले,
‘ काय आहे ?’
बाबासाहेबांची तीक्ष्ण नजर त्याच्यावर
जाताच त्याची तर गाळणंच उडाली .
‘नाही ! काही नाही ‘
दरवाज्यामागून परत दबक्या आवाजात
इशारा , ‘अहो ! बोला ,
काही तरी बोला !’
‘ मग इथे उभे का ? ‘
‘ नाही , बाबासाहेब !
त्या दिवशी तुम्हांला जेवण मिळाले नाही ,
‘ मग त्यात काय ? ‘
‘ तसे नव्हे ! तर रमाबाई , यशवंत
आणि मुकुंदहि त्या दिवशी उपाशीच झोपले .’
‘ काय ? ‘
बाबासाहेबांनी मोठ्या आश्चर्याने
विचारले .
‘ होय बाबासाहेब , त्या दिवशी घरात
काहीच नव्हते , आणि हे रमाबाईने
आम्हा कोणासच सांगितले नाही ,’
‘ ठीक आहे ! तुम्ही जा .’
तो नामधारी सासरा पडत्या फळाची आज्ञा मानून
पटकन बाहेर आला.
त्याचा घसा कोरडा पडला होता. दोन
ग्लास पाणी ढसा –
ढसा प्याला तेव्हा त्याला आणि सर्वांना हायसे
वाटले . त्या प्रसंगानंतर थोड्याच अवधीत
बाबासाहेबांनी एक मोठा खटला जिंकला .
त्या खटल्याच्या अशिलाने
बाबासाहेबांनी फी म्हणून
चांगली मोठी रक्कम दिली होती .
ती रक्कम घेऊन बाबासाहेब घरी गेले.
त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार
घरी आल्यानंतर स्वतःला जे पैसे मिळत , ते
सर्व त्वरित श्री. का.वी.सवादकर
यांच्या हवाली करीत बाबासाहेबांच्या
सूचनेनुसार श्री. सवादकर
पैशांचा विनियोग करीत. तसेच
जमाखर्चाचा हिशोब बिनचूक
बाबासाहेबांना सादर करीत, परंतु
त्या दिवशी मिळालेले पैसे
सवादकरांच्या हवाली न करता बाबासाहेब
तडक आपल्या अभ्यासिकेत घेऊन गेले.
आणि रमाईंना हाक मारली ,
‘ रामू ‘
रमाई क्षणात हजर झाल्या .
‘ हे बघ , हे काही पैसे आहेत ते घे . मी आंघोळ
करून येईपर्यंत पैसे किती आहेत ते नीट मोजून
कपाटात ठेवून दे .’
‘ होय साहेब ‘ रमाई म्हणाल्या .
बाबासाहेब स्नानघराकडे गेले. रमाईने
दाराला आतून कडी घातली . बॅग उघडली .
बॅगेतील पैसे पाहून त्या माऊलीचे डोळे
विस्फारले . बॅगेतून नोटांची पुडकी बाहेर
काढली आणि नोटा मोजावयास सुरुवात
केली. परंतु गोंधळ,भीती,अज्ञ ान यामुळे
रमाईंना हिशोबच जमेना . नोटा मोजतांच
येईनात . बराच वेळ त्यात निघून गेला.
इतक्यात दारावर थाप पडली . रमाई
दचकल्या . घाबरल्या व नकळत तोंडातून
शब्द बाहेर पडले. ‘कोण आहे ?” अग रामू !
मी आहे . दरवाजा उघड ! आणि दार
का लावले आहेस ? ‘
रमाईने काही नोटा ओटीत असतानांच
दरवाजा उघडला . आतील प्रकार पाहून
बाबासाहेब खो खो हसत सुटले .रमाई
ओशाळल्या .
‘ अगं रामू ! काय हे ? चारी भिंतीजवळ तसेच
मधून ह्या नोटांच्या रांगा ? काय चाललय
हे ?’
साहेब ! तुम्ही म्हणाला होता, पैसे मोज ,
म्हणून मी पैसे मोजत होते .’ रमाई गोंधळून
बोलल्या .
‘ कसे मोजत होतीस ?’
हे काय ! एक विसा , दोन विसा , तीन
विसा,चार विसा,पांच
विसा,सहा विसा ,सात विसा आठ विसा,
नव विसा आणि दहा विसा . पुढे येईनाच .
आल तर पुना विसरतेय , पुना सुरु करतेय !’
बाबासाहेबांचे काळीज
त्यांच्या निर्व्याज्य प्रेमाने भरून आले.
प्रेमाने त्यांनी रमाईला थोपटले
आणि म्हणाले ….
‘ रामू ! या समाज कार्यात ,
या आपल्या दिन-दुबळ्या समाजाचा संसार
सुखी करण्यात मला माझ्या संसाराकडे लक्ष
द्यायला वेळच मिळत नाही. या सर्व
धावपळीत पैसा कसा खर्च होतो हे
मला कळतच नाही. तू माझ्यासाठी खूप
सोसले आहेस.
आपल्या संसारासाठी मी विलायतेत
असतांना तू शेणाची शेणकुट बनवून
विकली आहेस. परंतु आता ते दिवस संपले आहेत.
तू सुखाने आरामात रहा .
माझी काळजी करू नकोस…!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?