बौद्ध धम्मातील खास २० वैशिष्ट्ये

१) बौद्ध धम्माचे पहिले वैशिष्ट्य बौद्ध धम्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे. भगवान बुद्धाने नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे.
२) बौद्ध धम्माचे दुसरे वैशिष्ट्य भगवान बुद्धांनी देव नाकारला आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारी देव नावाची कोणती शक्ती नाही.
३) बौद्ध धम्मातील तिसरे वैशिष्ट बौद्ध धम्मात देव नसल्यामुळे आरती, प्रार्थना, आराधना नाही. कोणतेही कर्मकांड नाही. बौद्ध धम्मात वंदना आहे आणि वंदना ही निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे.
४) बौद्ध धर्माचे चौथे वैशिष्ट भगवान बुद्धाने देवाबरोबर स्वर्ग नाकारला आहे. स्वर्ग हे विज्ञानावर टिकत नाही किंवा त्याचे अस्तित्व आतापर्यंत कोणालाही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही.
५) बौद्ध धम्मातील पाच वैशिष्ट्य बौद्ध धम्मात जातीयता नाही. भगवान बुद्धांनी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव केला नाही.
६) बौद्ध धम्माचे सहावे वैशिष्ट बौद्ध धम्मात आत्मा नाकारला आहे. आत्म्यावर विश्वास नाही हा अनात्मवाद आहे.
७) बौद्ध धम्माचे सातवे वैशिष्ट बौद्ध धम्मात पुनर्जन्म नाही. भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला पुन्हा जन्म नाही, म्हणून या जन्मातच चांगले कर्म करा.
८) बौद्ध धर्माचे आठवे वैशिष्ट बौद्ध धम्माने कर्मकांडाला नाकारले आहे. बौद्ध धम्म सत्यावर आधारित असून व्यक्ति स्वातंत्र्याला पूर्ण वाव आहे.
९) बौद्ध धम्माचे नववे वैशिष्ट बौद्ध धम्मात मोक्षाची संकल्पना नाही भगवान बुद्धाने मोक्ष नाकारला. भगवान बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे. भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे.
१०) बौद्ध धम्माचे दहावे वैशिष्ट भगवान बुद्धाचा विचार हा समस्त मानवाच्या सुखाचा मार्ग असल्याने त्यास अनुसरल्याने मानवाचे मंगल होणार आहे.
११) बौद्ध धम्माचे अकरावी वैशिष्ट स्वयं प्रकाशीत व्हा. असा संदेश दिला आहे
१२) बौद्ध धम्माचे बारावे वैशिष्ट्य बौद्ध धम्माने मोक्ष नाकारला आहे. मोक्षप्राप्ती ऐवजी निब्बाण सांगितले आहे.
१३) बौद्ध धम्माचे तेरावे वैशिष्ट्य भगवान बुद्धांचा धम्म माणसाला वैर भावना ठेवू नका, मैत्री भावनेने वागा असे सांगतो.
१४) बौद्ध धम्माचे चौदावे वैशिष्ट्ये बौद्ध धम्म मानवतावादी आहे. बौध्द धम्मा मध्ये दैववाद नाकारला आहे.
१५) बौध्द धम्माचे पंधरावे वैशिष्ट बौध्द धम्म माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देतो. कल्पना, स्वर्ग, देव, आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष हे काल्पनिक आहे.
१६) बौध्द धम्माचे सोळावे वैशिष्ट्य बौध्द धम्म शुद्ध कर्म करण्यास सांगतो. वाचेने, मनाने नेहमी शुद्ध कर्म करा.
१७) बौध्द धम्माचे सतरावे वैशिष्ट्ये बौद्ध धम्म माणसाला आपले कर्तव्य आणि अकर्तव्य कोणते ते निश्चित समजावून सांगतो. माणसाला चारित्र्य आणि नैतिक मूल्य सांगतो, अचारसहिता ठरवून देतो.
१८) बौध्द धम्माचे अठरावे वैशिष्ट्य बौद्ध धम्म माणसाला जीवनात चांगले नियम, सद्गुण आणि चांगले विचार व चांगला दृष्टिकोन अवगत करण्यास सांगतो.
१९) बौद्ध धम्माचे एकोणिसावे वैशिष्ट्य बौद्ध धम्म म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, समतेने वागावे, मैत्री भावनेने वागावे.
२०) बौध्द धम्माचे विसावे वैशिष्ट्य बुद्धांनी नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे. मानवाचे जीवन सुखी व्हावे, मनुष्य कुशल कर्माकडे जावा आणि अकुशल कर्मापासून दुरावा हा हेतू भगवान बुद्धांचा होता.
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?