ws1

सेवानिवृत्त भीम अनुयायांना आंबेडकरी चळवळीत सक्रिय होण्याचे आव्हान!

Table of Contents

प्रस्तावना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्य केले, तळागाळातील बांधवाला गुलामीतून कसे बाहेर काढता येईल ह्या साठी आपल्या जीवाचे रान केले प्रसंगी आपल्या पोटची लेकरं ह्या समाजासाठी कुर्बान केले.

बांधवानो आज आपले संविधान धोक्यात आले आहे. ज्या पद्धतीने गेल्या १० वर्षात देशाचा कारभार केला गेला, त्या वर नजर टाकली तर आपल्या असे लक्षात येईल दिवसें दिवस रोजच ह्या महान अशा संविधानावर आघात करून त्याची ताकत कमी करण्याचा कुटील डाव सध्याच्या राजकारण्या कडून होत असलेला आपण पाहत आहेत. त्यामुळे आता परत पूर्वीचे दिवस येतील की काय अशा प्रकारच्या अनेक शंका कुशंका मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचे पाणी करून दिवस-रात्र एक करून आपणा सर्वांना ज्या गुलामीच्या बेड्यातून बाहेर काढले आणि सर्वांना समान हक्क संविधानाच्या माध्यमातून बहाल केले. तर त्याच संविधानामुळे सुख उपभोगत आहोत, सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तुंग अशी कामगिरी बजावत आहोत. असे असताना सध्या काही मनुवादी विचारसरणीचे आपले राज्यकर्ते परत आपणास पूर्वीचे दिवस आणु इच्छितात. ज्या वर्ण व्यवस्थेने आपणास गुलाम हजारो वर्षे गुलाम ठेवले तीच वर्णव्यवस्था परत आपल्यावर थोपण्याचा खूप भयंकर असा प्रयत्न होत आहे.

अशा प्रसंगी ज्या संविधानाने सर्वाना सर्वकाही दिले त्यास वाचविण्यासाठी आपण संघटित पणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. माझ्या समाजातील वरिष्ठ बांधवांनो आता सर्वजण मिळून आपण खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे.

बांधवानो आता पुढील पिढीचा विचार करून काही योग्य अशा स्टेप्स आपणाला घ्यावे लागतील बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आता स्वस्थ बसण्याची वेळ नाहीये जो काही फावला वेळ आपल्या हातामध्ये आहे तो इतर मोबाईल वापरामध्ये शॉर्ट बघण्यामध्ये युट्युब बघण्यामध्ये व्हिडिओ बघण्यामध्ये न दवडता चला आपण संकल्प करूया की जास्तीत जास्त आपला वेळ समाजाच्या कामी देऊ आणि समाजाचा जो रथ पुढे घेऊन जाण्याचे आव्हान बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले होते,  तो रथ आपापल्या परीने पुढे घेऊन जाऊया, त्या रथाला बाबासाहेबांच्या अपेक्षाप्रमाणे कमीत कमी त्यास मागे जाऊ देऊ नका अशी ही विनंती त्यांनी केलेली होती, तर त्या विनंतीस कुठेतरी जागण्याची आता वेळ आलेली आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यांनी किल्ला लढविला पण आता आपण एवढे करोडो लोक आहोत, सर्वजण मिळून थोडसं जरी काम केलं, तर मनुवाद्याला चाप बसल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या समाजातील नेते गटातटामध्ये विखरले गेलेले आहेत त्यांचा आपण विचार सोडून जर का आपण योग्य पद्धतीने समाजाचा रथ पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला, तर निश्चितच आपल्या येणाऱ्या पिढीला उज्वल भविष्य आहे. पण तन-मन-धन हे सर्वस्व अर्पण करायला आपण तयार असले पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे की तुमच्या मिळकती मधील एक चतुर्दशी 1/4 हिस्सा हा समाजाच्या कामासाठी जरूर खर्च केला पाहिजे.

फक्त आपणाला धन मिळालं पैसा मिळाला वैभव सुख मिळाला म्हणून थांबता कामा नये, मित्रांनो असेच सुख समाधान वैभव आपल्या बांधवाला मिळाले पाहिजे. जे गरिबीत अनेक वर्षापासून जीवन जगत आहे अशा आपल्या बांधवांचे आयुष्य कसे उज्वल करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.

मी संविधान रक्षणासाठी काय करू शकतो?

आपण ज्या क्षेत्रात शासकीय, निम शासकीय, खाजगी क्षेत्रामध्ये कार्य केले असेल, ज्या कामात आपला हातखंडा असेल त्या अनुभवाचा वापर करून आपण समाजासाठी काही करू शकतो ह्याचा विचार करूया. आज बीजेपी आणि आर एस एस एवढे मोठे कार्य कसे करत आहेत ह्याचा जर का सखोल विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की ते मिशन घेऊन चालत आहेत जसे की त्यांना भारताला हिंदु राष्ट्र घोषित करायचे आहे. प्रत्येक स्वयं सेवक महिन्याला ह्या मिशन साठी पैसे देतोच. त्याप्रमाणे आपल्यालाही तन मन धन संविधान रक्षणासाठी द्यावे लागेल.

ह्या गोष्टी रोज थोड्या थोड्या आमलात आणा

* प्रत्येक रविवारी बुध्द विहारात जाणे.
* सर्व बांधवाना एकत्रित करण्याचा प्रयत्न करणे.
* भावी पिढीस वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचनालय स्थापन करणे.
* आंबेडकरी चळवळीची माहिती इतरांना शेअर करणे.

* संविधान जनजागृती कार्यक्रम घेणे.
* ऍट्रॉसिटी कायद्याविषयी जनजागृती करणे.

तुमच्याने माझ्याने काय होणार आहे सर्व असं चालू आहे सर्व सध्या आणि मी काय करणार आहे मला माझ्या कुटुंब आहे मला माझं घर आहे मला त्याकडे लक्ष द्यावे लागेल असं जर आपण म्हटलं तर मग पूर्वीचे दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि आपली भावी पिढी चे भविष्य परत अंधकाम अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही तर चला तर मग पेटून उठू या परत आंबेडकरी चळवळीचा नाव जगभरामध्ये पोहोचलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्याचा आपण संकल्प करूया.

जय भीम जय भारत

ऍड. प्रेमसागर गवळी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?