*योजनेचा उद्देश* : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देणे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
*योजनेच्या प्रमुख अटी* :
● फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी
● अत्यल्प भुधारक शेतकरी
● अल्प भूधारक शेतकरी
● सुशिक्षित बेरोजगार
● महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ) (३ टक्के अपंगासाठी )
*दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष घटक योजनेअंतर्गत १० शेळ्या, १ बोकड गट वाटप करण्यात येतो. (७५ टक्के अनुदान विम्यासह र.रु. ५३४२९/-). तसेच दोन गाई / म्हैशींचे वाटप (प्रत्येक लाभार्थीस)
*दुभत्या जनावरांना खाद्य वाटप प्राधान्याने वरील योजनेत वाटप केलेल्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर भाकड काळासाठी गाईस १५० किलो व म्हैशींस २५० किलो खाद्य मोफत वाटप करण्यात येतो.
*अर्ज करण्याची पध्दत* : ऑफलाईन
*संपर्क* : विहित अर्जाचा नमुना मिळविण्यासाठी तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागास भेट द्या. त्या ठिकाणी हा अर्जाचा नमून उपलब्ध आहे.
*टिप* : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.
भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना…
*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता**आम्हा मुलांना…
1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम…
एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Washingtonpost या वृत्तपत्राने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, एल्गार परिषद-भीमा…