मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही.
“”
– प्रल्हाद केशव अत्रे
डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉ. आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरुषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडित झाले. यापेक्षा अधिक जीवनसाफल्य ते कोणते ?
भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना…
बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर…
*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता**आम्हा मुलांना…