कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका ….

प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे महायुद्ध संपले आणि वेगवेगळे देश दोन गटांमध्ये विभागले गेले, एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा , 1947 ला इंग्रज निघून गेले आणि भारताची सत्ता काँग्रेसच्या हातामध्ये आली, पंडित नेहरू यांनी दोन्ही गटात न जाता अलिप्तवाद स्वीकारला , यालाच अलिप्तवादी धोरण म्हंटले गेले, परंतु बाबासाहेब आंबेडकर अलिप्त राहण्याच्या विरोधात होते , त्यांनी म्हंटले की “जर उद्या चीन ने आपल्यावर आक्रमण केले तर रशिया मदतीला येणार नाही कारण तो त्या गटाचा भाग आहे आणि अमेरिकासुद्धा मदतीला येणार नाही कारण आपण त्या गटात नाहीत” आणि बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय भविष्य खरे ठरले , नंतर खरंच चीन ने आपल्यावर आक्रमण केले आणि आपल्या देशाचा काही भाग चीनने गिळंकृत केला, आपल्या बाजूने ना रशिया आला ,ना अमेरिका..

कश्मीर प्रश्नाची पार्श्वभूमी :- इंग्रजांनी भारत सोडून जाताना संस्थानिकांसाठी(राजे ,रजवाडे ) तीन पर्याय ठेवले होते
1)ते भारत देशात सहभागी होऊ शकतात.
2)ते पाकिस्तान देशात सहभागी होऊ शकतात
3)ते स्वतंत्र देश म्हणून सुद्धा राहू शकतात
हैदराबाद संस्थान अर्थात निजाम आणि कश्मीर चा राजा हरिसिंग वगळता सर्व संस्थानिक भारत किंवा पाकिस्तान देशात सहभागी झाले होते . त्या काळातील काँग्रेस सरकारने हैदराबाद संस्थान पोलीस ॲक्शन च्या नावाखाली अर्थात मिल्ट्री पाठवून हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले, आणि समर्थन असे केले की “हैदराबाद संस्थानामध्ये प्रजा हिंदू आहे आणि राजा मुसलमान आहे , आणि प्रजेची मागणी आहे की त्यांना भारत देशात सहभागी व्हायचे आहे”..पाकिस्तान ने सुद्धा कश्मीर वर हमला केला आणि हाच तर्क दिला “की कश्मीरची जनता मुसलमान आहे आणि राजा हिंदू आहे आणि मुसलमान लोकांची मागणी आहे की त्यांना पाकिस्तान मध्ये सहभागी व्हायचे आहे “..कश्मीर चा राजा हरिसिंग कश्मीर स्वतंत्र देश ठेवू इच्छित होता त्यामुळे तो भारत किंवा पाकिस्तान मध्ये सहभागी झाला नव्हता. पाकिस्तान कडून पराभव होऊ शकतो म्हणून मजबुरी मध्ये त्याने भारताची मदत मागितली , परंतु पंडित नेहरूंनी एक अट ठेवली “तुम्ही भारतात जर सहभागी होत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू ” आणि राजा हरिसिंग यासाठी तयार झाला आणि सविधानातील आर्टिकल 370 बनले (काही अटी आणि शर्ती च्या आधारावर कश्मीर देश भारत देशात सहभागी झाला, त्या अटी आणि शर्ती म्हणजेच संविधानातील आर्टिकल 370 होय ) ….

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका :-
कश्मीर जसा ही भारतात विलीन झाला ,तातडीने कॅबिनेटची बैठक बसली ,आणि पाकिस्तान सोबत च्या युद्धाची रणनीती ठरवली गेली, बाबासाहेबांनी भूमिका मांडली की “महार रेजिमेंटच्या सैन्याला तातडीने कश्मीरला पाठवण्यात यावे” आणि सर्वप्रथम पठाणकोट वरून हेलिकॅप्टर उडाले ते महार रेजिमेंटच्या जवानांना घेऊन , श्रीनगरला पोहोचल्यानंतर एक मिनिटाची विश्रांती न घेता महार रेजिमेंटच्या जवानांनी पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला , श्रीनगर पासून 20 किलोमीटरवर असलेले पाकिस्तानी सैन्य 100 किलोमीटर पाठी मागे हटले, बाबासाहेब आंबेडकर यांनी युद्धनीती वरील 400 पुस्तके वाचली होती , जी त्यांच्या ग्रंथालयात होती, महार रेजिमेंटच्या जवानांना वीर चक्र आणि परमवीर चक्र सुद्धा मिळाली ..बाबासाहेबांचे युद्धासंबंधी धोरण असे होते की “संपूर्ण कश्मीर ताब्यात घेऊ आणि भारताचे सैन्य लाहोरपर्यंत घेऊन जाऊ , तोपर्यंत कश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा युनोमध्ये घेऊन जायचा नाही ” ..

पंडित नेहरू ची ऐतिहासिक चूक :-
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणाविरोधात जाऊन ” संपूर्ण कश्मीर ताब्यात घेण्या अगोदरच ,नेहरू ने काश्मीरप्रश्न युनोमध्ये मांडला , आणि जी भीती बाबासाहेब आंबेडकरांना होती तेच झाले , युनोने युद्ध थांबवण्याचा आदेश दिला आणि LOC अर्थात लाईन ऑफ कंट्रोल तयार झाली आणि कश्मीरप्रश्न खितपत पडला ..बाबासाहेब आंबेडकरांचे ऐकले असते तर कश्मीर प्रश्नाचा निकाल त्याच काळात निघाला असता ….
2)नंतरची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी बाबासाहेबांनी दुसरी योजना तयार केली ” जम्मू आणि काश्मीरचे तीन राज्यांमध्ये विभागणी करणे a)जम्मु , हिंदूंचा भूभाग ( ऐतिहासिक दृष्ट्या जम्मू हा कधीच कश्मीर देशाचा भाग नव्हता,) b)लेह आणि लदाख (बुद्धिस्ट लोकांचा भूभाग) c) कश्मीर चे खोरे …मुसलमान लोकांचा भूभाग
जम्मू आणि लेह लदाख भारतात विलीन करायचा आणि कश्मीर खोऱ्या बाबत तेथील लोकांचे जनमत घ्यायचे ..आणि कश्मीर खोर्‍यातील लोकांचे म्हणणे काय आहे “त्यांना भारतात विलीन व्हायचे आहे, की त्यांना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे आहे, हे ठरवण्याचा अधिकार तेथील लोकांना देण्यात यावा …परंतु असे जनमत न घेता कश्मीर चा प्रश्न तसाच भिजत ठेवण्यात आला ….
बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रातील तज्ञ व्यक्ती होते, MA, Phd, Msc, Dsc एवढ्या कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डिग्र्या घेतल्या होत्या …त्यामुळे देशाची प्रचंड संपत्ती कश्मीर प्रश्नावर लावण्यात येत होती , एवढा प्रचंड पैसा जर देशाच्या विकासावर खर्च केला असता तर देश प्रगतीपथावर गेला असता , परंतु काश्मीरचा प्रश्‍न तसाच ठेवल्यामुळे प्रचंड पैसा अर्थात साधन आणि संसाधन कश्मीर वरती खर्च करावे लागते , सतत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यामुळे प्रचंड प्रमाणात युद्धाची तयारी करून ठेवावी लागते , देश हितासाठी हे करणे योग्य आहे परंतु जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही योजनेवर नेहरूंनी अमलबजावणी केली असती तर कश्मीर प्रश्नाचा निकाल लागला असता …काँग्रेस आणि नेहरूंच्या ऐतिहासिक चुकीची सजा आज ही देश भोगत आहे , आमच्या वीर जवानांना शहीद व्हावे लागत आहे …हे सर्व नेहरुच्या चुकीच्या विदेश नीती आणि कश्मीर बाबत चुकीचे धोरण ठरवल्यामुळे झाले आहे …
बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता , त्या चार कारणांपैकी हे एक प्रमुख कारण होते की “नेहरूचे कश्मीर प्रश्नावर चुकीचे धोरण आहे अर्थात नेहरुची विदेश निती खराब आहे ”

सारांश :- काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रश्नावर आज भाजपा राजकारण करत आहे , यांना हा प्रश्न तसाच ठेवायचा आहे आणि यावरच निवडणुका जिंकायच्या आहेत , त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस किंवा भाजपा सरकार बनवेल कश्मीरचा प्रश्न तसाच राहणार आहे , आर्टिकल 370 चे आकलन आणि विश्लेषण भाजपा चुकीच्या पद्धतीने करत आहे , त्यामुळे कश्मीर मधील मिलिटंट लोकांचा फायदा होत आहे ,

उपाय :– डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार बनवावे लागेल , देशातील संपूर्ण मूलनिवासी बहुजन समाजाने एकत्रित येऊन फुले आंबेडकरी विचाराचे सरकार बनवावे , तेव्हाच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल …

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?