गीताचे नाव – प्रथम नमू गौतमा (Pratham Namo Gautama)
गायक – शाहीर विठ्ठल उमप (Shahir Vitthal Umap)
शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा
प्रथम नमू गौतमा चला हो, प्रथम नमू गौतमा
तथागताची तत्त्वप्रणाली , आचरण्याची मुभा मिळाली
जीवनानंदे आज बहरली , वैशाखी पौर्णिमा
करू बुद्धमय उभ्या धरेला , बेत मनीचा नेत इरेला
रम्य चंद्रमा आज उदेला , इथेच थोडे रमा
शुद्ध शीलाचं लेऊन लेणं , बुद्धं सरणं गाऊ गाणं
करुया पावन अपुले जीवन , होऊन सारे जमा
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


