ना भाला ना बरछी ना घाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
नव्या भागिताचे स्वप्न ते हसू दे
तुझी भीम शक्ति जगाला दिसू दे
जुन्या गावकिचा दुवा साधला रे
आहे भीम युगाचा नवा दाखला रे
ना पाटिल ना वाड़ा ना गाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
असे कैक वैरी अचंभित केले
रूढ़ि च्या नीतिला रे तुच चित केले
चाललों आम्ही पण शिखर वैभवला
गरज आज नाही कुनाची आम्हाला
ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
तुझा तू जपावा नवा वारसा तू
स्वताला स्वतः घडव माणसा तू
नको मेजवाणी अशी दुर्जनाची
भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची
ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती
आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती
सोडला आम्ही तो वाळवंट सारा
भीमाने दिला हा सुखाचा किनारा
ना दरया ना सागर ना नाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
ना भाला ना बरछी ना घाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे