अमेरिका येथील कोलंबिया युनिर्व्हसिटी जगातील शिक्षा संस्थांमध्ये प्रमुख मानली गेली आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी याच विश्वविद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण घेतले होते. येथील विश्व विद्यालयाच्यादृष्टीने त्यांनी जाती संस्थेच्या विनाशाचा प्रमुख रूपात अध्ययन केले होते. इ. स. १६५४ मध्ये स्थापन झालेल्या कोलंबिया या संस्थेला २५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या संस्थेतील आजी-माजी विद्यार्थ्यांतून १०० महान विद्वानांची यादी जाहीर केली होती. त्या यादीत डॉ. भिमराव आंबेडकरांचे नाव प्रथम क्रमांकावर होते.
डॉ. बी. आर. आंबेडकर या संस्थेत इ. स. १९१६ मध्ये शिकत होते. जगाच्या महान विद्वानांच्या यादीत अमेरिकेच्या दोन राष्ट्रपतींची नावे सुद्धा आहेत. आणखी काही देशातील सहा राष्ट्राध्यक्षही आहेत. किती तरी असे विद्वान आहेत, ज्याना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नाही तर या यादीमध्ये आयन्स्टीन नावाचा महान संशोधक सहाव्या क्रमांकावर होता.
अमेरिकी मीडियामध्ये या बातमीची फार मोठी चर्चा होती, परंतु भारतीय मीडियामध्ये या चर्चेचं कुठेही नाव नाही.
शंभर महाविद्वानांना निवडल्यानंतर जगभरातील विद्वानांच्या या कमिटीने डॉ. भिमराव आंबेडकरांचे नाव प्रथम क्रमांकावर ठेवले व त्यानंतर या सर्वांचे नाव लिहिले गेले.
या स्मारकाला कोलंबिया विश्वविद्यालयाच्या एका प्रमुख जागेत लावले गेले. भारताच्या या महान व्यक्तीचे नाव असल्यानंतरसुद्धा भारतीय मिडियात या महान बातमीला जागा मिळू शकली तर नाहीच परंतु कोलंबिया ऑस्कर युनिर्व्हसिटींनी भारतातील शासनकर्त्यांना (सरकारला) लिहून पाठविले आहे की, तुमच्या देशातील या महान व्यक्तीला हे सन्मानपत्र मिळाले आहे, तुम्ही हे सन्मानपत्र घेऊन जा. परंतु येथील सरकार ते आणू शकली नाही. (परिवर्तन चर्चा दि. ५ नोव्हेंबर २०११ वरून) अमेरिकेच्या एका विश्वविद्यालयाने एक ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्याचं नाव ‘दी इवेन्टस मुड द होल वर्ड’ नावाचे हॉवर्डमधून प्रकाशित ग्रंथामध्ये निवडक १०० विद्वानांचे नाव नोंदविण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न नसून, विश्वरत्न आहेत. एवढेच नाही तर २००५ मध्ये जगातील ४० विद्वानांपैकी सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विश्वविद्यालयात बाबासाहेबांना ‘फाऊंडींग फादर ऑफ मॉडर्न इंडिया’ म्हणून गौरवितात.