नमोस्तु गौतमा
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा
ज्ञानदीप चेतवी घालवी तमा
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा
सदय हृदय अभयदान देई तू स्वये
अंतरंग शांत करीत जीवनात ये
सकल मलीन जाळण्यास भीम शक्ती दे
अखिल भुवन उजळण्यास प्रेम भक्ती दे
करी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा
नवनवीन रूप धरून येई अज्ञता
बुद्ध देई भारतास त्या प्रबुद्धता
विषसमान विषमता न अजून लोपली
या जगास शिकवणूक दिव्य आपली
परम करूण लोचनात दाटली क्षमा
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा
धम्म शरण संघ शरण लोक साधना
शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना
नव युगात मिळवूयात जनसमानता
हाच धम्म हेच ध्येय येई मानता
भीमरूप धरून तूच शिकविले अम्हा
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा