डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकावा लागला….
(काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी…) ६ डिसेंबर १९५६… महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस… अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती… नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती… प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता… त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी …