श्रम माझे बाळांनो आठवूणी
हे रक्त स्वताचे घटवूणी
प्रचाराचे रान हे उठवूनी
बुद्धाचा धम्म द्या पटवूनी
श्रम माझे बाळांनो आठवूणी
हे रक्त स्वताचे घटवूणी
हा राग द्वेष मोहमाया नको
अविचार असत्य मुळीच नको
प्रज्ञा शील करुणा आचरणी
पाप कर्म अनीति मुळीच नको
त्रिसरन आणि ती पंचशीला
अष्टांगिक मार्ग तो आचरुणी
श्रम माझे बाळांनो आठवूणी
हे रक्त स्वताचे घटवूणी
धर्म जाती भेद मुळीच नको
मनसा माणसात हा वाद नको
रक्तपात नको घातपात नको
मानवाच्या जिव्हारी आघात नको
रक्ताची ही नाती जुडवूणी
विषमतेला त्या कटवूणी
श्रम माझे बाळांनो आठवूणी
हे रक्त स्वताचे घटवूणी
मानवता खंगली भ्रांतीने
जे दिले ते आठवा मातीने
बुद्धाच्या सम्यक क्रांतिने
क्रांतीहि घडवा शांतीने
जगूया रे येथे प्रेमानी
प्रभाकरा भारत नटवूणी
श्रम माझे बाळांनो आठवूणी
हे रक्त स्वताचे घटवूणी
संघटना एकीने सांधावी
ममतेने तुम्ही ती बांधावी
बोधिवृक्ष फुलू द्या ही पालवी
सुख शांति जिवणी लाभावी
बुद्ध कबीर फुले त्या विचारांनी
अविचारा ठेवा घटवूनी
श्रम माझे बाळांनो आठवूणी
हे रक्त स्वताचे घटवूणी
प्रचाराचे रान हे उठवूनी
बुद्धाचा धम्म द्या पटवूनी
श्रम माझे बाळांनो आठवूणी
हे रक्त स्वताचे घटवूणी