पाऊल पुढचे पुढे हे | Paul Pudhache Pudhe he Bhim song Lyrics

पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी

पाण्यासाठी हे जीव तळमळती
जीव जीवाला का हे छळती
स्पर्श करुणी पाणी हे पिणार आहे मी
समान हक्क मानवाला देणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी

पाणी निसर्गाची हो देणगी ही
माणूस मानसा का पाण्यात पाही
नात एक जिवांचे जडणार आहे मी
सत्यासाठी अकाठी लढणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी

सत्याग्रह हा चवदार तळ्याचा
मानवी हक्काचा हा सत्याचा
दुष्ट रूढीवर तुतुणी पडणार आहे मी
परिवर्तन माणसात घडवणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी

पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?