भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का | Bhimraya Vani Sanga Pudhari Bhim song Lyrics

सुज्ञानाचा निर्मल झरा

भीमासारखा माणूस खरा

जन्मा येईल का

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का

असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का

मानापाणाला कधीच नाही चुकून हा पापणारा

धंनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा

वादळातली समजनौका किनारी लविल का

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का

असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का

करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा

दिनदलितासाठी दिन रात्री तळमळणारा

भीमासारखा कर्तुत्वाचा पहाड होईल का

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का

असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का

देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई

अशी भीमाची करणी तिला जगात मोलचं नाही

अशीच गोधन दिनदलितांची ओझी वाहिल का

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का

असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का

सुज्ञानाचा निर्मल झरा

भीमासारखा माणूस खरा

जन्मा येईल का

माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का

असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?