भीमरायाने दलिता सहारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्याना निवारा दिला
जग सारे झोपले तो नाही झोपला
रात्र दिन जागुणी देशासाठी खपला
जागे करुनी समाजा पहारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्याना निवारा दिला
भीमरायाने दलिता…
शिकवूनी समाजाला तो ही शिकला
स्वार्थापायी कुणाकडे कधी नाही झुकला
दुख जाणूणी सुखाचा उबारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्याना निवारा दिला
भीमरायाने दलिता…
उपकार बाबांचे ते नाही फिटणार
प्रभाकरा तइसा कुणी आज नाही झटणार
क्रांति घडवूणी माणसा निखारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्याना निवारा दिला
भीमरायाने दलिता सहारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्याना निवारा दिला