जरी झाला बरिस्टर तरी पडला ना ईसर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
नको पुरणाची पोळी अन गोडधोड खाया
वाटू लसणाची चटणी संग तोंडी लावाया
तो अति आनंदानं बाई जेवल पोटभर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
चिकनं चोपड खायाचा नाही भीमाला शोक
या समाज सेवेची त्याला लागलिया भूक
पंचपकवान स्वादिष्ट ना जेवला वेळेवर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
त्या गोर्या साईबाचा होता गुलामाला धाक
पण बाबासाहेबांनी कापल गुलामीच नाक
मस्का स्लाईच बुरून पाव त्यांन्ना मारीली ठोकर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
आडातल भरलाय त्या गडी संजयानी
तांब्या भरून देऊ त्याला माठातल पाणी
हे जेवण जिरवाया टाकू दुधात साखर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर