आपली बुध्द विहारे ओस का पडली?आम्ही बौध्द असूनही धम्मकार्याबाबत एवढे उदासीन का?आम्हाला रविवारी शासकीय सुट्टी असून देखील बुध्द विहाराची वाट का दिसत नाही?रविवारी फिरायला, आराम करायला, चित्रपट पहायला, शॉपिंगला, हॉटेलिंग,मित्रासाठी, वाढदिवस,रिसेप्शन, लग्न समारंभ पार्टी आदी. साठी वेळच वेळ आहे फक्त बुध्द विहारात जाण्यासाठीच वेळ नाही असे का ?
वरील चार प्रश्नाचे जर तुमच्या कडे खरच उत्तर नसेल तर सर्वप्रथम आपण या प्रश्नावर प्रत्येकाने चिंतन, मनन करून उत्तरे शोधणे आवश्यक वाटत नाही का ?
ही उत्तरे शोधणे म्हणजेच आपण आपली योग्य वाट तपासून पाहणे.आपण धम्म मार्गावर अजून किती दिवसाने येणार आहोत?की येणारच नाही याचा विचार आता गंभीरतापूर्वक करणे गरजेचे आहे.जर तुम्ही फक्त तुमच्या चार लोकांच्या(स्वतः, पत्नी, मुलगा व मुलगी) एवढ्याच विश्वातच गुरफटून गेला असाल तर सावधान !
गृहस्थी जिवन जगत असताना गृहस्थी जिवनाची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडणे ही आपल्या सर्वांचे कर्तव्यच ठरते. परंतु, हे कर्तव्य पार पाडत असताना आपले अजुन एक अत्यंत महत्वाचे कर्तव्य आहे ते कधीही विसरून चालणार नाही. ते म्हणजे आपण बौध्द असल्याने रविवारच्या दिवशी सहपरिवार नियमित बुध्द विहारात जाण्याचे.
हे केवळ नुसते कर्तव्य नाही तर एक नैतिक जबाबदारी आहे. परंतु, आम्ही सर्वजण सुशिक्षित बौध्द लोक याकडे सोइस्कर जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहोत. सध्यपरिस्थितिमध्ये बौध्द समाजात वर्तमानात ज्या कौटुंबिक,सामाजिक समस्या दिसत् आहे त्या बुध्द विहारात न जाण्यामुळेच उदभवलेल्या आहे. जसे की, लहान मुलांवर धम्माचे योग्य वयात नेमके कोणते संस्कार करावेत हेच आजच्या माता पित्यांनाच माहित नाही.
जर रविवारच्या दिवशी प्रत्येक माता पिता आपल्या स्वतः च्या मुलांना सकाळीच बुध्दविहारात घेवून गेले तर ती बालके उद्याची आदर्श नागरिक होतील. ही मुले भविष्यात कधीही व्यसनी होणार नाही. ते प्रबुध्द समाजाचे सुसंस्कारी नागरिक म्हणून सर्वत्र क्षेत्रात समाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रिडा, चित्रपट, नाटके, साहित्य आदी.प्रतिनिधित्व करतील.
युवक युवतिचे उच्चशिक्षण घेवून देखील योग्य वयात असताना वेळेत लग्न जमत नाही. जमले तरी धम्म आचरण न करणारे लोक भेटत नाही. मग सांसारिक जीवनात कलह होतात.लाखो रुपये लग्न सोहळावर खर्च करून देखील काही संसार टिकत नाही .नुसते बौध्द पद्धतीने विवाह लावून चालणार नाही, तर त्या धम्म संस्कारानुसार पती पत्नीला जिवन जगावे लागेल.नियमित पती पत्नी बुध्दविहारात गेल्यावर त्यांच्या पोटी धम्मधर संतान जन्मेल.त्यांच्यामध्ये कधीही भांडण झगडा होणार नाही. सुखाने संसार करतील. पती व पत्नी एकमेकांच्या प्रती एकनिष्ठ राहतील. म्हणजेच दुराचार करणार नाही, पती व्यसन करणार नाही.त्यामुळे आर्थिक प्रगती सोबतच सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
वुद्ध आई व वडिलांच्या प्रती मुलांना विशेष आदर व प्रेम वाटत नाही.परंतु, बुध्द विहरात गेल्यावर आई व वडिलांच्या विषयी प्रत्येकाच्या मनामध्ये सेवाभाव उत्पन्न होईल. स्वार्थ दूर सारून प्रत्येक युवक आपल्या आई वडिलांची, सुन आपल्या सासू सासऱ्याची सेवा करेल. त्या सेवेचे महत्व त्यांना कळेल. अशी गुणवाण आदर्श मुलगा व सून सर्वाना हवी असते. मात्र त्यांच्यामध्ये हे चांगले गुण यावेत ह्यासाठी बुध्द विहारात नियमित जाणे आवश्यक आहे.
पति पत्नीत,भाऊ बहिणीमध्ये,आई वडील व मुलांमध्ये, सासु व सुनेमध्ये,सासु सासरे व जावई असलेला द्वेष,तिरस्कार करण्याची भावना दिवसेंदिवस वाढत चालली आहे.नातेवाईकांमध्ये देखील एकाची प्रगती झाली तर दुसऱ्याला पाहवत नाही. कोणाची मुले नोकरीला लागली तर मनातून चांगले वाटत नाही.जर बुध्द विहारात नियमित गेल्यावर सर्वांच्या प्रती मैत्रीभावना, करुणाभाव निर्माण होईल. कोणीही कोणाचा द्वेष करणार नाही. वैरत्व कमी होईल किंवा कायमचे नष्ट होईल.आपली जशी प्रगती व्हावी तशीच इतरांची देखील व्हावी असे अतःकरणातून वाटेल नुसते केवळ तसे वाटणारच नाही तर नातेवाइक ,मित्र परिवार व इतरां च्या प्रगतीसाठी वेळोवेळी कायम मदत करण्याची भावना वाढेल.
महिलांना केवळ मोबाईल, टीव्ही, सौदंर्य, आभूषणे,दाग दागिने याच गोष्टिची आवश्यकता वाटत आहे. त्यांना स्वतः च्या अपेक्षा पूर्ण करण्याची ज्यास्त गरज वाटते.सामाजिक कर्तव्याचा पूर्ण विसरच पडलेला दिसतोय.
बुध्द विहारात महिला गेल्यावर त्यांना धम्म आचरण करण्याची प्रेरणा मिळेल. सासरच्या व माहेरच्या दोन्ही बाजुकडील लोकांना समान समजन्याची समज येईल.सासू सासरे,दिर व दिणंद ह्या नात्याचे देखील तितकेच महत्व वाटेल जितके माहेरच्या सर्व नातेवाईकांचे नेहमीच सदोदित वाटते.त्याचप्रमाणे जुन्या चालीरीती,परंपरा, धार्मिक रुढी संस्कार याची निरर्थकता सुद्धा समजेल. म्हणजे आपोआप त्या सर्व जुन्या प्रथा परपंरा बंद होतील.त्याचे नव्या पिढीकडे हस्तांतर होणार नाही.
पुरुष, युवक कोणत्याही निमित्ताने फक्त मौज मज़्ज़ा करून नेहमीच खाण्या पिण्याच्या पार्टि करण्यात दंग आहे.मोबाईल वर गाणी ऐकण,कम्प्यूटर, टीव्ही,बाईकवर राइडिंग करणे हेच फैड सर्वत्र तरुणामध्ये दिसते..सोशल मीडियावरच ज्यास्त सक्रिय आहे.
बुध्द विहारात गेल्यावर शरीराच्या सोबत मनाचा देखील आळस दुर होईल. मन चांगले व वाईट याविषयी विचार करू लागेल. वाईट गोष्ट सोडून देण्याचा विचार मनात येईल.चांगली सज्जन व्यक्ती म्हणून जिवन जगण्याची उत्कट इच्छा निर्माण होईल.व्यसनाचे दुष्परिणाम कळतील. व निर्व्यसनी जिवन जगण्याचे फायदे समजतील.
बौद्धांचे विधी,सण, उत्सव,संस्काराचे महत्व कसे केले जातात याचे ज्ञान नसणे. बौद्धाचार्य यांना विधि शॉर्टकट घ्या असा सल्ला देणे हा त्याच अज्ञानाचा एक भाग आहे.बुध्द विहारात गेल्यावर बुध्द धम्म व संघ या त्रिरत्ना विषयी श्रद्धा वाढेल. धार्मिक जिवनाचे महत्व लक्षात येईल.सोबतच आपण देखील श्रामणेर व्हावे, विपश्यना शिबिरे करावे असे वाटेल.मग धार्मिक जिवनात संस्काराचे किती महत्व आहे समजेल.
धम्माचे दैनंदिन आचरण न केल्यामुळे होणारी स्वतः ची, परिवाराची व समाजाची हानी लक्षात न येणे.
आता तरी, सर्वांनी बौध्द बांधवानी बुध्दविहारात जाण्याचे महत्व लक्षात घ्यावे. बुध्द विहारात जो पर्यन्त आम्ही नियमित सहपरिवार जाणार नाही तोपर्यंत धम्म अज्ञानीच रहावे लागेल. व हे अज्ञान केवळ तुमचेच नसेल ते अज्ञान संपूर्ण समाजाचे समजले जाईल.धम्माचे दैनंदिन आचरण न केल्यामुळे होणारी स्वतः ची, परिवाराची व समाजाची हानी लक्षात न येणे.ही बाब खुपच चिंताजनक आहे. जिवनातील अशांतता,नैराश्य,चिंता, हतबलता, भिती,ताणतणाव,नात्यातील दुरावा, व्यसनाधीनता, असफलता,मानसिक विकार, शारिरिक व्याधीमुळेच त्रस्त आदी. अश्या सर्व दुःखामुळे जिवन नकोसे वाटते. परंतु, या सर्व समस्याकडे तटस्थपणे पाहून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा की फक्त बुध्द विहारातच मिळते.
आता तरी, आपण सर्वांनीच बुध्दविहारात जाण्याचे महत्व लक्षात घ्यावे. बुध्द विहारात जो पर्यन्त आम्ही नियमित सहपरिवार जाणार नाही आम्हाला दुःख मुक्तीचा सापडणार नाही. जगामध्ये सर्व सर्व गोष्टि स्कैनिग् करण्याचे मशीन उपलब्ध आहे, परंतु मानवी जिवनातील अचूक दुःख मोजणारे,ते दुःख दूर करणारे, त्या दुःखातून कायमची मुक्तता मिळणारे असे मोजमाप करणारे साधन कुठेच उपलब्ध नाही.हे सर्व फक्त तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितले आहे.प्रत्येकाच्या दुःखाचे कारण, स्वरूप, दुःखाची तीव्रता ही परिस्थितिनुसार भिन्न असू शकते मात्र सर्वांना दुःख आहे हेच अंतिम सत्य आहे, म्हणूनच हे दुःख कसे कमी करावे,या दुःखातून कसे दूर राहता येईल असे सर्व उपदेश फक्त बुध्द विहारातच मिळतात. आपण जसे शरीर स्वास्थ्य ठीक रहावे म्हणून व्यायाम करतो, अगदी त्याचप्रमाणे मनातील क्रोध, लोभ, द्वेष,आसक्ती, भय, अंहकार, वासना आदी. दुर्गुण (विकार) वाढू नये.मनाची जागृतता, सजगता, स्थिरता, संयम, विधायक वळण,शांतता, गंभिरता,प्रज्ञा, करूणा, मैत्री, बंधुता, एकता, नैतिकता, शुद्धता,कर्माप्रती सावधानता आदी. ही बुध्द विहारात गेल्यावरच लाभेल.जिवनात प्रत्येकालाच स्त्री असो अथवा पुरुष यांना शांतता, वैभव, सन्मान, प्रतिष्ठा, सुख, समृद्धी, प्रगती, दीर्घायुष्य,निरोगी आरोग्य, सुदृढ़ मानसिक आरोग्य पाहिजे आहे. हे सर्व बुध्द विहारात गेल्यावर हळू हळू सर्वांना नक्कीच प्राप्त होइलच.परंतु त्यासाठीच प्रत्येकानेच नियमित बुध्द विहारात सहपरिवार गेलेच पाहिजे.
*चला,बुध्द विहारात जावून*,
*अज्ञान दूर करूया*,
*धम्म आचरण करून*,
*उन्नत समाज घडवूया*
(सूचना- *ज्यांना रविवारी सुट्टी नसेल त्यांनी आपल्या निवासस्थानी रविवारची बुध्दवंदना सकाळी किंवा सायंकाळी ७.०० वाजता न चूकता नियमित घ्यावी* .)
टिप-सदर लेखाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
– बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे,
धम्मप्रशिक्षक धम्मसन्डे स्कूल,नाशिक
मो.९९६०३२००६३
96