बुद्धांचे पहिले प्रवचन : दु:ख मुक्तिची प्राप्ती.
चित्तस्स एक्स्स गत्ता ……….!”
–प्रा.बा. र.शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६
संपूर्ण मानवाच्या मुक्तीचा एकच मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय आणि आपण त्याचा साकल्याने विचार करीत आहोत . बुधांच्या मूल सूत्रात अष्टांगिक मार्गाची जशी मांडणी आहे तशीच मांडणी डॉ.बाबासाहेबांनी यात मांडणी केलेली आहे परंतु एकंदरीत बुद्धधर्माचा या परिशुद्धीकडे नेहण्याच्या निरवाणाकडे नेहणारा विचार आधुनिक लोकांना स्पठ व्हावा म्हणून थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडला गेलेला आहे . उदा पंचसील हा अष्टांगिक मार्गाचा मूळ आधार मानून अभिवचन केले आहे आणि त्यास त्यांनी नाव दिले आहे Path Of Purity यालाच विशुद्धीचा_मार्ग असे म्हणट्ले आहे .
विशुद्धीचा मार्ग स्वीकारल्या शिवाय अष्टांगिक मार्गाचाचे पालन करने काठीन आहे हे त्यांची भूमिका आहे . दुसऱ्या भागात या मार्गाची माहिती दिली आहे आणि त्यास अजून दुसरे नाव दिले आहे Path_of_Rrightness.हा सदाचाराचा मार्ग, म्हणजेच अष्टांगिक मार्ग होय . या पुढे जाऊन असेही म्हंतटले आहे की मनाची परीसुद्धी करणायचा पाया जो श्री भगवान बुध्दाने सांगितलं आहे तो म्हणजे #पारमितेचा मार्ग होय . यालाच पुढे जाऊन बाबासाहेब असे म्हणतात की Path_of_archive. अश्या तीन भागात त्यांनी अष्टांगिक मार्गाचा सारांश जोडला आहे . ही मांडणी पारंपरिक पद्धती पेक्षा अत्येंत वेगळी असून अधुनिक काळात उपयुक्त आणि उचित आहे .
एकूण अष्टांगिक मार्ग आठ असले तरी यात महत्वाची दोनच अंग आहेत
१_स्मेकसती
2_संयेकसमाधी
सती म्हणजे स्मरण . नुसते स्मरण नशून मूळ अर्थ असा लावता येईल की Awareness म्हणजे सतत ची जागरूकता . कायम जागे राहणे सजग असने किंवा Continues Alertness. थोडक्यात सावधान राहणे हा सतीचा मूळ अर्थ आहे . आणि मनाला सवयच लाऊन घेतली पाहिजे की जे करतोय ,जे वागतोय आणि रोज अनुभवतोय ते आणि त्या कडे जगरूकतेने पाहण्याची आणि त्याची दखल घेण्याची , मनाला सवय लावणे आवश्यक्ये आहे . म्हणून सम्यक सती हे अतिशय महत्वाची बाब आहे .
सम्यक सती बळकट होण्यासाठी मनाचा व्यायाम महत्वाचा आहे . हा व्यायाम कसा असावा जे कुशल असेल तो व्यायाम ,ज्या मुळे मन स्मृद्ध होते . अकुशल असेल तर मनाची शक्ति मारली जाते . रोजच्या जीवनात हे दोन भाग फार महत्वाचे आहेत.
आपण रोजच्या जीवनात याच दोन मार्गाने जीवन जगत असतो . थोडक्यात चांगले आणि वाईट . माणसाचे मन अधिक चंचल होत जाते . मनाची साधना त्याला करावीच लागते कारण ही चंचल वृती रोजच्या व्यवहारात आपला सतत पिछा करीत असते . आपल्या वागण्या बोलण्यात सगळीकडे चंचलता येते ,कारण यात राग ही आहे आणि द्वेष ही आहे . चांगेल-वाईट ,कुशल अकुशल आहे . या दूरीच्या द्वंद्वत जीवन जगत असताना To be or not to be चे जीवन होते . म्हणून सम्यक व्यायामची गरज आहे . यातून हे द्वंद्व संपवण्याची शक्ति निर्माण होते . यातील व्यायमचा पहिला प्रकार म्हणजे जे चांगले आहे ते टिकवायचे.थोडक्यात तेच मनात कायम टिकवायच . मन कमजोर कधीच होऊ द्यायचे नाही .मनाला सतत बळकटी देत राहावे .
दूसरा प्रकार म्हणजे जे चांगेल झाले नाही ते मनात निर्माण करणायची जिद्ध तयार करायची. कांही बाबतीत कुशलचित्त निर्माण होत नाही ते निर्माण करायचे . हे दोन प्रकार कुशलांचा पाठपुरावा करणारे व्यायाम आहेत . दुसरे दोन जे आहेत ते मनाची हानी करतात . अकुशल हे कुशलला मारन्याचे काम करतात आणि हानी करतात तपासून
वाचले पाहिजे कायम दूर राहिले पाहिजे . जे अकुशल मनात आलेले आहे त्याचे उच्चाटन करा . त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करा जे मनात अकुशल येऊ पाहत आहे त्याला
रोकून ठेवा त्यासाठी बांध घाला .त्याला जवळच येऊ देऊ नये अश्या तऱ्हेने मनाला कमजोर करणाऱ्या या दोन नकारात्मक पद्धती आहेत ,यांच्या पासून सावध राहण्याचा प्रयत्न करावा . मनाला जी शिकवण दिली तसे वागावे लागते ,आणि सतत जागृती बाळगावी लागते . म्हणून ‘सम्यक सती’चा अभ्यास त्याचा सुरू होतो. त्यांनी हे करण्यासाठी सतत सावध be alert राहिलेच पाहिजे कोणत्या क्षणी मनात काय येईल ,तो मनाचा कांही भरवसा नाही ?
कोणत्या क्षणी आपल्या मनाची काय आवस्था असेल ते आपणास कळत नाही . कांही घटना होऊन गेल्यावर कळतात ,अरे ते आपले चुकले. रागात आपल्याला काय करायचे ते करतो ,ते नंतर कळते की आपण चुकीचे केले आहे . अरेss आपले चुकले असे समजतो आणि नंतर पश्चाताप होतो . मग त्या चुकीला कांही नंतर अर्थ उरत नाही . राग येताच त्याची दखल घेणे हे ही तेवढेच म्हत्वाचे असते.
मन ,चित्त सतत दक्ष आणि सावध असले पाहिजे राग आलेला आहे आणि हा राग अकुशल आहे या प्रमाणे मला वागायचे नाही हे ठरवायला हवे . हे मला माझ्यात टिकू द्यावयाचे नाही ते हद्दपार कराचे आहे.eradicate करायचे आहे हा ठाम निश्चय झाला पाहिजे.
मग हद्दपार करण्याचा मार्ग सोप्पा आहे . यावर एकच उपाय आहे ,तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि तीन वेळा बाहेर टाका ,रागाचा पारा आपोआप उतरतो यामुळे रागाच्या भरात जे करतो ते कधी होणारे नाही . राग उतरल्यावर राग विरहित जर आपण एखादे कार्ये केले तर मनाला शक्ति येते . यातून आत्मविश्वसा बळकट होतो हे फार महत्वाचे आहे .
आज माणसाला व्यावहारिक जीवनात जगण्या साठी आत्मविश्वासाची खूप गरज आहे . हा आत्मविश्वास फक्त सकारात्मक माध्यमातून वाढतो दुसरे एकही मध्यम आज तरी या जगात उपलब्ध नाही . त्याला जर बळ कोठून मिळत असेल तर ते व्यावहारिक ज्ञानातून मिळते.त्यालाच आपण Information किंवा knowledge असे म्हणतो .
जेवढे ज्या विषयाचे आपणास ज्ञान असेल तेवढे त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो . मूळ आत्मविश्वास ज्याला आपण समजतो तो त्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून असतो ; आणि तो असतो मनाच्या सकारात्मक आवस्थे मध्येच .
ते,ज्ञानास अधिक पोषक आणि पूरक म्हणून काम करते .यालाच आत्मविश्वास असे म्हणतात हा प्रतेक व्यक्तीत असतोच असे नाही . जेवढा माणूस रागीट तितका त्याचा आत्मविश्व्स्स कमी ,जेवढा द्वेषी त्याचा आत्मविश्वास नसल्या समान आहे. यालाच बुद्धधम्मात त्याला ‘बळ’ असे म्हणतात . हे बळ कोनात ही नसते ,ते कमी लोकात असते . हे बळ अधिक वाढवण्यासाठी व्यायामाची ,सतत सराव करण्याची गरज आहे . याच बळाने_स्मृति जागृत राहते . आश्याने माणसाचा पुढील विकासाचा टप्पा जो आहे तो साध्य होतो . यालाच सम्यक_समाधी असे म्हणतात .
डॉक्टर बाबासाहेबांनी विप्पसणे ची विभागणी ही दोन भागात केलेली आहे . एक समाधी आणि दुसरी सम्यकसमाधी .पाली भाषेत यालाच चित्तस्स_एक्स्स_गत्ता असे म्हणतात.
चित्ताची एकाग्रता म्हणजेच समाधी होय . आणापाणा मधून चित्ताची एकाग्रता साध्ये होते . या एकाग्र चित्तानं जेंव्हा आपण जीवनाच्या मनाचे चिंतन मनन करतो , सखोल गंभीर ,वरवर चे नाही त्या एकाग्र मनाच्या समर्थपणे होते त्यातून आपल्या चित्तात जो बदल होतो तसे तसे आपल्या समाधी जागृत होतात त्या अवस्थेला #सम्यक_समाधी असे म्हणतात . यात तुमचे मन बदलून जाते , कांही जडण घडण होते ते नवीन आणि वेगळी होते ,जे अशुद्ध आहे ते गळून पडते . याच मानसिकतेत तुम्ही जगायला लागता . म्हणूनच परिशुद्ध आवस्था जी आहे चित्ताची त्यालाच सम्यक समाधी असे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात.
ही उपरोक्त बाबासाहेबांची समाधी ची भाषा आहे . थोडक्यात समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता होय . जसे पालीत लिहले आहे जसेच्या तसे बाबा साहेबांनी यात लिहले आहे .
चित्तस्स_एक्स्सगता_समाधी’ ही समाधी प्राप्त करून घेण्यासाठी मानसाच्या मनामध्ये पाच प्रकारचे अडथळे असतात असे श्री भगवान बुद्ध सांगून गेले आहेत.
या मनाच्या अनेक प्रवृती मुळे तो आपला एकाग्रता साध्य करू शकत नाही . मन आपले चंचल आहे . चंचल कशामुळे आहे . हे विनाकारण आहे का चंचल ? विनाकारण नाही याला कारण नक्कीच लागते , हा विश्वाचा नियम आहे . श्रुष्टीचा नियम आहे त्याला नक्कीच कारण लागते . मग विचार करा मन चंचल का आहे ? याची करणे आहेत ते पाच कारने बुद्ध धम्मात सांगितली आहेत . यालाच पंच_निवरण असे संबोधले जाते .इंग्रजी भाषेत five fitters असे म्हणतात .हेच मानवी जीवन उज्वल करण्यात येणारे आडथळे आहेत .
पहिला अडथळा लोभ – जो पर्यन्त मानसाच्या मनात लोभ घर करून आहे तो प्रयेंत चंचलता राहनारच . लोभाचा स्वभाव कसा, जिकडे लक्ष जाईल ते आपल्याला हवे असते . ते पाहिजे असते ,जे मनात येईल ते आपल्याला हवे असते . म्हणून एका क्षणात हे तर एका क्षणात ते असे चंचल होते . मन जिकडे जाईल तिकडे घेऊन जाते . जे मनात ते आपल्याला पाहिजे तिकडे घेऊन जाते ,मन क्षणात बदलत असते हे पाहिजे का ते ? अशी अवस्था करून टाकते.
लोभावर नियंत्रण ठेवले पाहिजे . वाटेल ते प्रत्येक गोष्ठ हवी ती भावना कमी केली पाहिजे . परत तिथे जागृतीचा प्रभाव येतो ,अरे यात माझे कांही अडलेले नाही . मला हे नको ते नको असे मन तयार झाले पाहिजे . ही भावना निर्माण झाली की लोभाची मात्रा कमी होते . मार्केट मध्ये छान कपडे बघून नुसते चालतो का पुढे ,मन आपले काम कारायला सुरुवात करते . ते दिसतात कसे सुंदर ते घायला पाहिजे . हे
चांगले दिसते घायला पाहिजे असे किती तरी मनामध्ये लिस्ट होऊन जाते . त्या क्षणी त्याची गरज असते का पण मन त्या कामात गुंतले जाते .गरज नसताना अश्या तर्हे ने मनाची एकग्रता कमी होते . अश्या आवडीच्या खूप गोस्ठि असतात आपल्या आवती भोवती ,या मध्ये कांही लोकांना तर नादच लागतो . आणि मार्केटिंग ची सवय लागते. नुसतेच फिरत राहण्याची सवय लागते ,यालाच यूरोपियन देशात ‘Window Shopping’ असे म्हणता . घ्यायचे कांही नाही पण मनाच्या खिडकीत काय देखावा तो पाहत फिरायचे आणि मनात लिस्ट करायची, नुसतेच मन चंचल म्हणून बाजारात गेल्यावर जे लागेल ते घेणे आणि सरळ घरी निघून येणे . हा त्याला आळा घालणायचा प्रकार आहे ,म्हणून लोभाळा आळा घातला पाहिजे . यामुळे एकाग्रता होते, विचलित होत नाही .
दुसरी भावना ,आडचनीची सांगितली आहे ते म्हणजे द्वेष मत्सर –
यामुळे माणसाला राग येतो ईर्षा येते ,नावड येते तिरष्कार येतो हे सारे द्वेसाचे भाऊबंध आहेत. गोतावळा ,परिवार या पैकी जी भावना निर्माण होईल तेंव्हा आपली एकाग्रता गेली . केंव्हा राग येईल याचा पत्ता आहे का ? द्वेष केंव्हा ही येऊ शकतो त्याचा कांही पत्ता नाही .ईर्षा मत्सर द्वेष राग हे कायमच चालू असते . कोणत्या क्षणी काय निर्माण होईल याचा भरवसा नसतो . एकंदरीत आपले मन एकाग्र होन्याचे थांबते आणि त्या भावना विश्वा मध्ये रममाण होते . मन वाटल, जात आणि त्याची विभागणी होते क्षती होते . हा आडथळा आहे म्हणून द्वेष रोखला पाहिजे .याचा परित्याग केला पाहिजे .म्हणून मानत सतत मैत्री भावना करुणेचे लक्षण ठेवा असे बुद्धाणे संगितले आहे . जे काही करेन ते मैत्री भावनेच्या रूपातून करेन ,जे काही बोलेन मैत्री करुणेचे बोलेन जो काही विचार करेन मैत्री करुणेच्या भावनेतून करेन हा विचार मानत ठेवावा असे वागन्याचा सतत प्रयत्न म्हणजे #सम्यक_व्यायाम आहे . सम्यक स्मृति आहे . म्हणजे माणसाला Meditation करताना ध्यान करायचे आणि एरवी कसे ही वागायचे असा प्रकार आहे का ? नाही . हे दोन जीवनाचे इतके म्हत्वाचे अंग आहे .
थोडक्यात हा व्यायाम कायम करावा ;आणि आपला रोजचा जीवन मार्ग सुखकर करावा .स्वतः सुखी होऊन सकल जनास सुखी करावे .
नमों बुद्धाय ! जयभीम !! सर्वांच्या प्रति खूप खूप मंगल कामना.!!!
संदर्भ –
1.‘बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ बोधिस्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
2.विशुद्धीमग्ग –बुद्धघोष
@@@
प्रा. बी.आर .शिंदे ( विशेष कर्णबाधिरांचे शिक्षण – CWHI )
नेरूळ ,नवी मुंबई 706
#brshinde_CWHI
Email : balajiayjnihh@gmail.com
Mobile 9702158564