जय भीम नेटवर्क हंगेरी विषयी थोडेसे…

हंगेरी देश, मध्य युरोप तिथे रोमा ही जिप्सी ट्राईब, जमातीचे लोक आहेत ज्यांनी सामाजिक, समतावादी चळवळीसाठी बाबासाहेबांना स्वीकारलं आहे.
सन २००६ मधे Derdak Tibor हे पॅरिस मधे असताना Christophe Jafferlot याचं लिखित Dr Ambedkar and Untouchability हे पुस्तक वाचण्यात आलं तेव्हा भारतीय अस्पृश्य व रोमा या हंगेरियन लोकांची समाज राजकीय परिस्थिती व त्यांची आव्हाने त्यांना सारखी दिसली. बाबासाहेबांच्या कार्याला प्रभावित होऊन त्यांनी तिथे २००६ मधेच रोमा नेते Orsos Janos यांच्यासोबत Jaibhim Network या संघटनेची स्थापना केली. Derdak Tibor यांनी स्वता बाबासाहेब प्रमाणे बौद्ध धम्मही स्वीकारला आणि मध्य युरोप, हंगेरी देशात पहिल्यांदा २००७ मधे Sajokaza, Miskok इथे Dr Ambedkar school ची स्थापणा केली. या व्यतिरिक्त दोनच वर्षांत रोमा समुदायाकडुन प्रतिसाद मोठा मिळाला म्हणून इतर चार ठिकाणी Ozd, Alsozsolca, Hegymegy, Szendrolad इथेही Dr Ambedkar school सुरू करण्यात आले. रोमा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या, उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं काम सध्या ते Jai Bhim Network आणि Dr Ambedkar school मार्फत करत आहे. बौद्ध साहित्य सोबतच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं त्यांच्या भाषेत भाषांतरित करण्याच काम चालु आहे, ज्याचं ते वितरण मोठ्या प्रमाणात देशभर करणार आहे. !!

बाकी भारतात मात्र बरेच अनुसूचित जातीतले लोक, विचारवंत असं म्हणतात की बाबासाहेब स्वीकारताना बुद्ध स्वीकारण्याची गरजच नाही. आणि मग हे लोक दलित बनुन हिंदु धर्मात जीवन जगत राहतात कोणत्याही धार्मिक शोषणाच्या मुक्तीच्या पर्यायाशिवाय. शोषकांच्या फक्त राजकीय नाही तर सामाजिक, धार्मिक वर्चस्वाला पण झुगारावं लागतं, त्यागावं लागतं हे मर्म कळलं पाहिजे. म्हणून फुलेनी सुद्धा हिंदु धर्म त्यागुन सार्वजनिक सत्यधर्म स्थापण केला तर बाबासाहेबांनी हिंदु धर्म त्यागुन बौद्ध धम्म स्वीकारला. थोडक्यात शोषित जातीनी बाबासाहेब अर्धवट, सोयीने स्वीकारु नये. हंगेरीच्या रोमा लोकांकडून हे शिकण्यासारखं आहे. त्यांनी बाबासाहेब सोबत बुद्ध स्वीकारला, शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे. सामाजिक विचार प्रक्रिया बदलुन, त्यात परिवर्तन आणुन मग ते राजकीय क्रांतीकडे वळणार आहे. This is a systematic approach पद्धतशीर मार्गक्रमण करत आहे.

-Rahul Pagare

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?