सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग,भारत सरकार कडून 2021-22 या वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात पदव्युत्तर आणि पी. एच.डी. या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करण्यासाठी एन.ओ.एस.पोर्टल उघडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी हे पोर्टल दिनांक-: 15/02/2021, ते 31/03/2021 या कालावधीपर्यंत सुरु राहील. सदर आॅनलाईन अर्ज करण्याची वेबसाइट www.nosmsje.gov.in आहे. फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे www.nosmsje.gov.in यावरती उपलब्ध आहे.