तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला

दिपक सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

-सतीश हानेगावे

दिपक सूर्यवंशी तगरखेडा गावाचा सुपुत्र. त्यावेळची जी दोन -चार नावे घेता येतील अशा दलित समाजातला तो पदवीधर -पदव्युत्तर शिक्षण घेतलेला युवक. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेला एक तरुण व्यक्ती. धडपड त्याच्या रोमारोमात भिनलेली. खिशात रुपया नसतानाही बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूलची स्थापना निलंगा येथे केली. तो सतत प्रयत्नशील राहिला घरी कधीच बसला नाही. अनेकदा सामाजिक कार्यात त्याच्या वाट्याला उपेक्षाच आली. तरीही तो खचला नाही, शेवटपर्यंत लढत राहिला. तगरखेडच्या दलित समाजात अशा पद्धतीने कार्य करणारा निस्वार्थ, निस्पृह कार्यकर्ता सापडणे दुरापास्त आहे. प्रा. व्ही.एम.कुलकर्णी सर, अभंग सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी आम्ही वेगवेगळ्या चळवळीत काम करीत आलो. तो भारावलेला प्रत्येक क्षण या क्षणाला आठवतो आहे. मन गहिवरून येतं आहे. त्यावेळचा प्रत्येक घटना- प्रसंग चलचित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून तरळून जात आहे. आता फक्त बघ्याची भूमिका घेणे एवढेच आज या क्षणी आपल्या हाती आहे. सुबोध मगरेसरांशी यासंबंधी चर्चा केली दोघेही खूप अवघडून गेलो. काही क्षण शब्द मौन झाले.आंतर भारती असो की आंबेडकरी चळवळ किंवा सामाजिक उपक्रम दिपक नेहमीच अग्रेसर असायच. दिपकच्या अशा अचानक जाण्याने साऱ्या गावासोबतच आंबेडकरी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे, याचे मनस्वी दुःख वाटते. असा कार्यकर्ता समाजात पुन्हा होणे नाही. ज्यांच्या ज्यांच्यासाठी तू किंमत चकवलास तो प्रत्येक व्यक्ती या क्षणाला गहिवरून गेला आहे हे निश्चितच!
दिपक मित्रा, कोणत्या शब्दांत श्रद्धांजली अर्पण करुन तुच सांग?…
अत्तदीपो भव:

1 thought on “तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला”

  1. आंबेडकर चळवळीतील असा कार्यकर्ता मिळणे अतिशय दुर्लभ आहे. त्यांच्या पवित्र स्मुर्तीला विनम्र अभिवादन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?