जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं | Jivala Jivach Daan Majhya Bhiman Bhim song Lyrics

पैलू माहिती
गीतकार लोकशाहीर वामनदादा कर्डक
Singer (गायक) श्रावण यशवंते

जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं

झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं

साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी
यश घेऊन आली भीमाची लेखणी
असं अमृताचं पान माझ्या भीमानं केलं

एका गरीब घरी जन्माला येऊन
तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन
अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं

आला कोलंबियाहून पी एच डी होऊन
दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन
त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं

आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा
मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा
असं आम्हा बलवान माझ्या भीमानं केलं

राजदरबारी अशी केली कारागिरी
लोकशाहीचा धुरा लेऊन आपल्या शिरी
कायद्याचं कार्य महान माझ्या भीमानं केलं

 

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.