भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत पोठ्ठपादो मासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः सप्टेंबर महिन्यात येते. या पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनातील काही महत्वपुर्ण घटना घडल्यात.
१ भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश
२ वर्षावासाची तिसरी पौर्णिमा
३ भगवान बुद्धाचे वर्षावासा
१ भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश
तथागत जेतवनात असतांना राजा प्रसेनजीत त्यांच्याकडे गेला व धम्मोपदेश देण्याची हात जोडून विनंती केली. भगवंताने राजाला पुढील प्रमाणे उपदेश दिला.
१ आपली चांगली किंवा वाईट कर्मे आपल्या छायेप्रमाणे पाठलाग करीत असतात.
२ मैत्रीपूर्ण हृदयाची आवश्यकता सर्वाधिक आहे.
३ आपल्या प्रजेस आपल्या एकुलत्या एक अपत्यासारखे समजावे.
४ दुसऱ्यांना खाली पडून स्वतः वर नेण्याचा प्रयत्न करू नये.
५ दुःखी लोकांना सांत्वना द्यावी
६ राजकीय थाटामाटाला जास्त महत्व देऊ नये.
७ खुशामती लोकांच्या गोडगोड गोष्टी ऐकू नये
८ कायाक्लेशाने स्वतःस त्रास देऊ नये
९ धर्म आणि सुमार्ग याचा विचार करावा
१० अन्याय करू नये
११ कामाग्नीचे भय सर्वांसाठी समान आहे
१२ जो एकवेळ त्या भोवऱ्यात फसेल त्याचे बाहेर निघणे कठीण आहे.
१३ धम्माची अशी मागणी आहे की मार रुपी शत्रूंपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे
१४ स्वतःच्या विचारांवर नजर असू द्यावी
१५ भौतिक वस्तूंच्या तुच्छतेवर खोलवर विचार करायला पाहिजे
१६ जीवनाच्या अस्थिरतेला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे
१७ राजधर्म नियमांचे उल्लंघन करू नये.
१८ बाह्य पदार्थांना आपल्या प्रसन्नतेचा आधार न बनविता प्रीतीयुक्त मनासच प्रसन्नतेचा आधार बनवावे म्हणचे राजाचे यश भविष्यात अमर होईल.
२ वर्षावासाची तिसरी पौर्णिमा
वर्षावासात एकूण चार पौर्णिमा येतात. भाद्रपद पौर्णिमा ही वर्षावासात येणारी तिसरी पौर्णिमा. या वर्षावासाची सुरवातही अहिंसेच्या पुरतेखातर, करूणा व मैत्रिभावणेच्या गरजेतुन झाली. पावसाळ्याच्या दिवसात भिक्खूगण एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी चालत जातांना गवतातील कीटक त्यांच्या पायाने मारले जायचे. अशा प्रकारेही आपणावर हिंसेचे पातक नको, म्हणून वरील तीन महिन्यांच्या कालावधीपूरती भिक्खुंची भ्रमंती स्थगित करून कोणा एका ठिकाणी मुक्काम करून धम्माची शिकवण भिक्खुंनी अनुयायांना द्यावी असे वचन भगवंतांनी घातले.
३ भगवान बुद्धाचे वर्षावास
भगवान बुद्धाने संबोधी प्राप्त केल्यानंतर धम्म-प्रचाराच्या कालावधीत ४५ वर्षे सतत पायी प्रवास करून पवित्र असा धम्म जगास दिला. भगवंतांनी आपला वर्षावास सारनाथ येथे संपन्न केला. त्यांच्या सारनाथ येथील वर्षावासांसह एकूण ४६ वर्षावास झाले.
सारनाथ – १
राजगृह- ५
वैशाली – २
मुंकुल पर्वत -२
संसुमारगिरी – २
कौशम्बी – १
परिलेयक -१
नाला – १
वैरंजा – १
चालिय पर्वत- ३
श्रावस्ती -२५
आलवी – १
कपिलवस्तु -१
भाद्रपद पौर्णिमेच्या सर्वांना मंगल सदिच्छा