नको हे कांचन | Nako Hey Kanchan song lyrics

श्रेणी माहिती
गीताचे नाव नको हे कांचन
गायक (Singer) आनंद शिंदे (Anand Shinde)
गीतकार (Lyricist) हरेंद्र जाधव (Harendra Jadhav)
संगीतकार (Music Director) हर्षद शिंदे (Harshad Shinde)
आलबम (Album) A For Ambedkar – Bhim Buddh Geete

नको हे कांचन अंग भूषवाया
नको हे कांचन अंग भूषवाया

हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या.
नको हे कांचन अंग भूषवाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या…2

रुप चंद्र आभाळाला शोभते,
कुंकू तसे कपाळाला लागते…2
गगन जसे या धरतीला छाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या…।।1।।

दागिने हे घडीभर शोभते,
माझे तुम्ही जन्माचे सोबती…2
तुम्ही हे जीवन माऊलीची माया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या…।।2।।

हट्ट धरुनी माघीतल मागण,
टोपली भर आणल तुम्ही दागिन…2
जाऊ दिले नाही ते वचन वाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या…।।3।।

बँरिस्टर तर धनी तुम्ही माझे हो,
हरेन्द्राचे दलितांचे राजे हो…2
कोटी कोटी जीव हे आलात उद्धाराया…2
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या…।।4।।

नको हे कांचन अंग भूषवाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या…..

 

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.