Yenaar Bai Barrister saheb maajh bhimgeet song lyrics | येणार बाई बरिस्टर साहेब माझ

वदे रमाई साजणे बाई
काय सांगू मी ती नवलाई
मन गहीवरल फूलून बहरल
पतुर आलय आज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ

गुणी गुणांचा राजा दिनांचा
थाटण्या संसार साज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ
गोड गोड ही काणी पडली सुमधुर ग वाणी
धन्य झाले मी ऐकून सारं त्या राज्याची राणी
साकार झाल फड़ाला आल सपान वैभव ताज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ

दुबळ्या संसारात माझ्या दिले कोट्या नु कोटी
त्या बाळाना गोंजराया समर्थ माझी ओटी
मनी ग स्फूर्ति पाहून किर्ति मन हे मनात लाज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ

आई अशी मी कोटी दिनांची नशिब माझ थोर ग
या घरट्यात पाजीन त्यांना ही मायेची धार ग
दुखीतांच शोषितांच शिरी वाहण्या बोझ
येणार बाई बरिस्टर साहब माझ

कुंकु भारी हे भाग्याच झाल आज धनवान
गड़ी पोत ही काळ्या मन्याचि भासे मौल्यवान
सांगू कस ग वाट अस ग हर्षदा दिलराज
येणार बाई बरिस्टर साहेब माझ

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?