| घटक | माहिती |
|---|---|
| Version | He Naana Unplugged (हे नाण दिसतया शोभून) |
| Singer | Sanyukta Sonawane |
| Lyricist | Prabhakar Pokharikar |
| Music Composer | Rutvik Tambe |
| Theme | बाबासाहेबांचे फोटो नाण्यावरून प्रेरित संदेश |
मन माझं गेलंय आनंदून
माझा भीम यात पाहून
अग हे नान दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटून
शंभर वर्ष पूर्ण जाहली
बाबासाहेबांच्या जन्माला
याच महापुरुषान नवा
जन्म दिधला आम्हाला
अंतःकरण येई गहिवरून
माझा भीम यात पाहून
अग हे नान दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन
नव्हता निंदा नेता खंदा
होता माझा भिमराया
काळजाच्या कणात
जपून ठेवीन बंदा रुपाया
येई आठवण राहून राहून
माझा भीम यात पाहून
अग हे नान दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन
पोस्टाच्या त्या तिकीटावर
बाबासाहेब आंबेडकर
रेल्वेच्या त्या इंजिनवर
बाबासाहेब आंबेडकर
ऐचं एम टी च्या घड्याळावर
बाबासाहेब आंबेडकर
नाव गाजतया जगभर
बाबासाहेब आंबेडकर
किती विश्वात गेलाय ठेवून
माझा भीम यात पाहून
हे नान दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन
साक्षी प्रभाकर आज घरोघर
कोटी कोटी हृदयावर
धन्य जाहले भीम पाहिले
सरकारी या नाण्यावर
बुद्ध कबीर फुलेंच्या पुण्याईने
माझा भीम यात पाहून
अग हे नान दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन
मन माझं गेलंय आनंदून
माझा भीम यात पाहून
अग हे नान दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटून


