सादरकर्ता (Singer/Presenter) ~लोकशाहीर वामनदादा कर्डक
माणसा इथे मी तुझे गीत गावे
असे गीत गावे तुझे हित व्हावे
असे तुझे माझे नाते जडावे
तुझ्या संकटाशी इथे मी लढावे II१II
तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे
तुझे दुःख सारे गळुनी पडावे II२II
एकाने हसावे लाखाने रडावे
असे विश्व आता इथे न उरावे II३II
इथे सारे सारे नवे पेरताना
वामनपरी मी तुझे हात व्हावे II४II
माणसा तुझे मी इथे गीत गावे
असे गीत गावे तुझे हित व्हावे…
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


