धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर
औरंगाबाद – अडीच हजार वर्षानंतर थायलंड येथील महाकारूनिक तथागत गौतम बुद्धाच्या पवित्र अस्थींचे दर्शन हे औरंगाबाद मधील तमाम अनुयायांना करण्यात आले. हजारोंच्या उपसकांच्या गर्दीत ही धम्मपदयात्रा परभणी येथून थायलंड मधील 110 बौद्ध भिक्खू आणि भारतीय बौद्ध भिक्खू यात सामील होते. परभणीतुन निघालेली पदयात्रा ही गुरुवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाली दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील केम्ब्रिज चौकातून ते तिसगाव या दरम्यान संपूर्ण रस्त्यांनी फुलांचा वर्षाव, जागोजागी रांगोळी काढून अनुयायांनी धम्मपदयात्रेचे स्वागत केलेलं दुसून आलं. औरंगाबाद येथील केम्ब्रिज चौकातील मुक्कामानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता तथागत बुद्धांच्या अस्थीकलशासह निघाली. सुंदर असा फुलांनी सजवलेला रथ आणि मागे भिख्खू यांच्या शिस्तप्रिय रांगेच्या परिसरातून अनुयायांच्या मुखातून “बुद्धम सरणं गच्छामि, धम्मम सरणं गच्छामि, संघम सरणं गच्छामि चा घोष करत अनुयायी रथाच्या मागे अगदी शिस्तीने धम्मपदयात्रेत चालत होती. संपूर्ण परिसर या घोषणा अगदी धम्ममय झाल्यासारखा वाटत होता. लहान मूल बाळ स्त्री पुरुष या सर्वांची गर्दी ही विलक्षणिय वाटत होती. चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, संजय नगर, मुकुंदवाडी, सिडको बसस्थानक चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रित चौक, जुने हायकोर्ट, LIC कार्यालय ते नगर नाक्यापर्यंत ठिकठिकाणी अनुयायांची अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी दिसून येत होती.
पदयात्रेत थायलंड येथील जागतिक गुरू लॉंगफूजी, भन्ते सोंगसेन फटफियन, भन्ते विचियान अबोत एम. सत्यपाल आणि आयोजक सिद्धार्थ हत्तीहंबीरे यांच्यासोबत समता सैनिक दलाचे सर्व स्त्री पुरुष जवान यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी धम्मपदयात्रेत सहभागी होते.
चिकलठाण्यातील माजी नगरसेवक रवी कावडे व बुद्धविहार समितीने धम्मपदयात्रेचे अगदी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. धम्मपदयात्रेला भरभरून प्रतिसाद औरंगाबाद व आजूबाजूच्या शहरातून मिळालेला दिसून आला.