धम्मचक्र प्रवर्तन दिवस – 2023

www.brambedkar.in तर्फे सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्या.

जाणून घेऊया धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबतल थोडक्यात माहिती.

बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन. दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात.

भारतात ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला.बौद्ध धर्मियांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे, कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.

बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केलं म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.

सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी, नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. 2 ऑक्टोबर 2006 रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील 10 लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन 1957 पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?