डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि लर्नेट स्किल्स लिमीटेड यांच्या तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणानंतर नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही आणि त्यामुळे नोकरी मिळणे अवघड असते. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील अनुसूचित जातीतील विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
तसेच, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण मुंबई येथील उल्हासनगर, कळवा व अंधेरी या तीन केंद्रांवर ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षण पुर्णत: नि:शुल्क असुन प्रशिक्षणाचा संपुर्ण खर्च बार्टी, पुणे मार्फत केला जाणार आहे.
ट्रेनी असोसिएट (रिटेल मॅनेजमेंट),
बिझिनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह (बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स),
कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट (बिझिनेस प्रोसेस आउटसोर्सिंग),
मायक्रो फायनान्स एक्झिक्युटिव्ह (बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस)
सारखे कोर्सेसचे प्रशिक्षणासाठी उपलब्ध असणार आहेत.
प्रशिक्षणाचे इतर फायदे :- इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, संगणक व उद्योजकीय प्रशिक्षण, मोफत प्रशिक्षण साहित्य (पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, वही, पेन, इ.)
प्रशिक्षण सुरु होण्याचा दिनांक : ९ ऑक्टोबर २०२३
प्रशिक्षण ठिकाण :- मुंबई (उल्हासनगर, कळवा व अंधेरी)
रजिस्ट्रेशन लिंक : – https://rb.gy/u62gx
सविस्तर माहितीसाठी पात्र उमेदवारांनी कृपया बार्टी संस्थेच्या संकेत स्थळाला भेट द्यावी :- https://barti.in/notice-board.फप
“बार्टी” च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांनी केले आहे.