BARTI आणि NIELIT यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील उमेदवारांच्या सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार

पुणे, महाराष्ट्र – *[२१/०९/२०२३]*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (BARTI) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे जी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT), भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MoE&IT) प्रशासकीय नियंत्रणाखाली एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य सचिव सुमंत भांगे आणि बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली, या स्तुत्य उपक्रमाचा उद्देश अनुसूचित जातीतील तरुणांची उन्नती आणि त्यांना आधार देणे हा आहे. हा उपक्रम बार्टीच्या कौशल्य विकास विभागाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या कौशल्य उन्नतीसाठी तसेच आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे महत्वपूर्ण पाऊल आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकासाच्या दृष्टीने BARTI आणि NIELIT यांच्यातील सामंजस्य करार खूप महत्वपूर्ण आहे. ही भागीदारी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम करेल, उत्तम रोजगाराच्या संधी आणि आर्थिक उत्पन्नवाढीचे दरवाजे उघडतील.
NIELIT सोबतची भागीदारी सर्वांसाठी समान संधी निर्माण करण्यासाठी आणि राज्यात सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी BARTI ची वचनबद्धता आणखी मजबूत करते.
BARTI आणि NIELIT च्या या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यांचे कौशल्य आणि संसाधने एकत्र करून, दोन्ही संस्था कौशल्यातील अंतर भरून काढण्यासाठी आणि दर्जेदार प्रशिक्षणाद्वारे अनुसूचित जातीच्या उमेदवारांना सक्षम बनविण्याचा संकल्प करत आहे .
MOU वर BARTI चे महासंचालक सुनिल वारे (IRAS) आणि NIELIT चे कार्यकारी संचालक डॉ. जयराज यू किदव यांनी BARTI पुणे कार्यालयात स्वाक्षरी केली. स्वाक्षरी समारंभाला डॉ. लक्ष्मण कोर्रा (जॉईंट-डायरेक्टर डीन – कौशल्य विकास विभाग) NIELIT, अनिल कारंडे (उपजिल्हाधिकारी आणि कौशल्य विकास विभागाचे प्रमुख) बार्टी, प्रज्ञा मोहिते (कार्यालय अधीक्षक – कौशल्य विकास विभाग) बार्टी ,महेश गवई (प्रकल्प व्यवस्थापक – कौशल्य विकास विभाग) बार्टी उपस्थित होते.
*NIELIT महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना औरंगाबाद केंद्रावर एकूण ६८ कोर्सेस (म्हणजे ४० – IT/सॉफ्टवेअर कोर्सेस आणि २८ – इलेक्ट्रॉनिक कोर्सेस) उपलबध करेल. प्रशिक्षण कार्यक्रम निवासी आणि अनिवासी पद्धतीने असतील.*
सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा अॅनालिटिक्स , अँड्रॉइड अँप डेव्हलपर, पायथन वापरून मशीन लर्निंग, वेब डेव्हलपर, सिस्टम आणि नेटवर्किंग स्पेशलिस्ट, मल्टीमीडिया डेव्हलपर, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), इंडस्ट्रियल ऑटोमेशन, कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स, एम्बेडेड अँप्लिकेशन डेव्हलपमेंट औरंगाबाद येथे बार्टी आणि NIELIT द्वारे ऑक्टोबर २०२३ च्या महिन्यापासून अभ्यासक्रम सुरु होतील .
*आत्तापर्यंत बार्टीच्या कौशल्य विकास विभागाने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या कुटुंबांना आणि कुटुंबांसाठी उपजीविकेच्या संधी उंचावण्यासाठी आणि उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी अनेक उपक्रम घेतले आहेत. “बार्टी” च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांचा समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनिल वारे (IRAS) यांनी केले आहे.*
छायाचित्रकार :- राहुल कवडे.
MOU is Signed between Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute (BARTI), Pune and National Institute of Electronics & Information Technology (NIELIT), Aurangabad at BARTI Office in Pune on Thursday, 21/09/2023.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?