१) कॅम्ब्रिज विद्यापीठ नुसार जगातील सर्वात हुशार १० व्यक्तींमध्ये बाबासाहेब क्रमांक १ वर आहेत.
२) नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी जाहीरपणे म्हंटल होतं कि डॉ आंबेडकर हे माझे अर्थशास्त्रातले वडील आहेत.
३) स्त्रियांना समाजात समान संधी मिळावी, मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क मिळावेत म्हणून डॉ आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन प्रधान मंत्री नेहरूंनी नकार दिल्याने आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु कुठल्याच स्त्रीवादी संघटनांना आणि कित्येक भारतीय स्त्रियांना याबद्दल माहित नाही. त्याकाळी राजकीय पक्षांत असलेल्या प्रतिगामी श्याम प्रसाद मुखर्जी यांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला होतां.
४) १९३५ मध्ये बनवण्यात आलेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया चा पाया डॉ आंबेडकरांच्या संकल्पनांवर आधारित आहे, त्यांनी हिल्टन कमिशन समोर मांडलेल्या अभ्यासपूर्ण प्रबंधाचा उपयोग या बँकेच्या स्थापनेसाठी करण्यात आला.
५) डॉ आंबेडकर हे दामोदर धारण प्रकल्प, हिराकुंड आणि सन प्रकल्पाचे निर्माते आहेत. महानदीच्या पत्राला अडवून तिच्या पाण्याचा बहुउद्देशीय वापर करावा यासाठी १९४५ मध्ये डॉआंबेडकरांच्या अध्यक्षते खाली समिती स्थापन करण्यात आली (मजूर मंत्री असताना) परंतु बहुउद्देशीय नदी प्रकल्प आणि औद्योगीकरणाच्या यशात डॉ आंबेडकरांचे नाव आणि मेहनत लपवून नेहरूंचे नाव सांगितले जाते.
६) डॉ आंबेडकरांनी उर्जा क्षेत्रात खूप महत्वाची आणि गरजेची असलेली “ग्रीड पद्धत” (विजेची वितरण पद्धत) आज सुद्धा यशस्वी पाने सुरु आहे तसेच मजूर मंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या शिष्यवृत्ती योजनेमुळे हजारो तंत्रशिक्षण विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जात आहेत आणि तज्ञ होऊन येत आहेत.
७) भारतात मजुरांना १२ तास काम करावे लागत असे, १९४५ मध्ये डॉ आंबेडकरांनी यात कपात करून ८ तास केले आणि मजुरांच्या आयुष्यात या मुळे खूप आनंद झाला आज सुद्धा प्रति दिवस ८ तास या प्रमाणे वेतन ग्राह्य धरले जाते आणि त्या वरती जास्तीचे पैसे द्यावे लागतात.
८) उर्जा निर्मिती व्यवस्था, जल उर्जा स्थानक, जल विद्युत यंत्रणा आणि अशा अनेक बाबींवर अभ्यास करणे आणि मार्ग काढण्यासाठी डॉ आंबेडकरांनी “सेन्ट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड” (CTPB) ची स्थापना केली होती.
९) आज भारतातील बराचसा आर्थिक भार ज्या गोष्टींवर अवलंबून आहे ते म्हणजे सिंचन आणि पाटबंधारे हे बाबासाहेबांच्या अथक परिश्रमातून आणि कुशाग्र बुद्धीमत्तेतून तयार झाले आहेत त्यांनी १९४४ मध्ये या साठी खास सिंचन आणि पाटबंधारे आयोग नेमला होता.
१०) आज जे ययशस्वीपणे पाण्याचे व्यवस्थापन आणि कोळसा खाणीतील प्रकल्प सुरु आहेत तसेच नैसर्गिक संसाधन चा योग्य वापर केला जात आहे त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्वताहून तयार केलेलं आणि परिश्रम केलेले यंत्रणा कारणीभूत आहे.
११) आज घराघरात पोहोचलेली वीज आणि पाणी हे डॉ आंबेडकरांच्या मेहनतीचं फळ आहे.
१२) दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची घडी बर्याच प्रमाणात विस्कळीत झाली होती, पुन्हा नव्याने भारताला खंबीरपणे उभे राहणे गरजेचे होते. देशाचे आर्थिक घडी पुन्हा बांधणे, त्यासाठी उपयोगी आणि सशक्त व्यवस्थापन उभारणे, मोडकळीस आलेला शेती व्यवसायाला हातभार लावणे, उद्योग आणि कारखान्यांना नव्याने जीवित करणे, संरक्षण प्रणाली ( मिलिटरी) चे पुनर्वसन आणि विकास साधण्यासाठी reconstruction committee council (RCC) स्थापन करण्यात आली होती डॉ आंबेडकर या समितीचे सभासद होते. सिंचन, शेती आणि उर्जा या वर त्यांनी खूप काम केले आहे.
१३) डॉ आंबेडकरांनी मध्य प्रदेशचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करावे आणि बिहार चे पटना आणि रांची असे दोन विभाग करावे असे या राज्यांच्या विकासासाठी हे फायद्याचे ठरेल असे १९५५ साली सुचवले होते. बरोबर ४५ वर्षांनी या दोन्ही राज्यांचे दोन भाग करावे लागले छत्तीसगढ आणि झारखंड २००० साली वेगळे करण्यात आले.
१४) भारतात स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचे डॉ आंबेडकर प्रणेते आहेत, त्यांनी स्त्रियांना त्यांचे हक्क मिळावेत, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून खूप मेहनत घेतली.