धम्मचक्र प्रवर्तन दिनी रेल्वे नागपुरात एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने या गाड्या मुंबई ते नागपूर, नागपूर ते पुणे आणि अजनी ते मुंबई विशेष शुल्कात चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-नागपूर वन-वे स्पेशल: ट्रेन क्रमांक ०१०७५ वन-वे सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०१०१७ वन-वे सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथेही थांबेल.
नागपूर-पुणे स्पेशल: ट्रेन क्र. 01030 वन-वे सुपरफास्ट स्पेशल 5 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.35 वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमद नगर आणि दौंड येथे थांबेल.
त्याचप्रमाणे ट्रेन क्र. 01011 वन-वे सुपरफास्ट स्पेशल 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.20 वाजता मुंबईला पोहोचेल. ही गाडी सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबेल.