*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात दलित पँथर पुनर्जीवित करण्याचा निर्धार*
मुंबई दि9. – दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करूया असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. दलित पँथर सुवर्णमहोत्सव सोहळ्याच्या चे आयोजन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ना.रामदास आठवले बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे; तेलंगणा येथील आंबेडकरी विचारवंत डॉ.मल्लीपल्ली लक्ष्मय्या हे उदघाटक म्हणून उपस्थित होते.विचारमंचावर अर्जुन डांगळे; माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे;दिलीप जगताप; भुपेश थुलकर; सुरेश सावंत; सुरेश केदारे;दिवाकर शेजवळ; लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर;लक्ष्मण गायकवाड; सुरेश बारशिंग; बबन कांबळे; गौतम सोनवणे दयाळ बहादूर;राही भिडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर आम्ही भारतीय दलित पँथर सुरू केली. घरादाराची राखरांगोळी करून आम्ही चळवळ चालविली. सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन भारतीय दलित पँथर आम्ही देशभर नेली.गावागावात दलितांना लढण्याची हिम्मत आणि विश्वास दिला असे ना.रामदास आठवले म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जपान चे पंतप्रधान दिवंगत आबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला आज प्रारंभ करण्यात आला असून वर्षभर सर्व राज्यात दलित पँथर चा 50 वा वर्धापनदिन सुवर्णमहोत्सव साजरा केला जाईल.यावेळी दलित पँथर मध्ये योगदान दिलेल्या दिवंगत पँथर्स च्या कुटुंबियांचा ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दलित पँथर कोणी स्थापन केली या वादात न पडता दलित पँथर्स ही जागतिक स्तरावर नोंद घेतलेली क्रांतिकारी संघटना होती. आज दलित ही दलित पँथर्स चे नाव घेतले तरी तरुणांचे क्रांतीसाठी रक्त सळसळते ;अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते असे मत तेलंगणा येथून अलेले विचारवंत उद्घाटक डॉ मल्लेपल्ली लक्षमय्या यांनी व्यक्त केले.
दलित पँथर्स ही भविष्याची गरज आहे. आज ना उद्या जरूर दलित पँथर पुन्हा निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून आपला देश कधीही हिंदुराष्ट्र होणार नाही त्याचे दोर कधीच संविधनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कापले आहेत असे डॉ रावसाहेब कसबे म्हणाले.
डॉ माईसाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक सन्मान आणि न्याय देण्याचे काम तत्कालीन भारतीय दलित पँथर चे नेते रामदास आठवले यांनी केले. तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथर ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ नामांतर लढा यशस्वी लढला असे डॉ रावसाहेब कसबे म्हणाले.
यावेळी प्रेक्षकांमध्ये सौ सीमाताई आठवले आणि जित आठवले उपस्थित होते.यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?