बार्टी, पुणे येथे 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा!

भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले .
बार्टी प्रांगणात कोरोना नियमाचे पालन करून प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये,यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, पुणे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विठ्ठल डावरे, डॉ. विकास डावरे , असिस्टंट कमिशनर जीएसटी, आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना श्री धम्मज्योती गजभिये, म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतर सुद्धा आपल्या देशात दारिद्र्य ,विषमता,गरिबी आहे.
बार्टी संस्थेत नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची मोठी क्षमता आहे.या संस्थेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकासोबत बार्टीतील‌ कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे जेणेकरून बार्टी आणि नागरिकांमधील ऋणानुबंध द्विगुणीत होण्यास मदत होईल . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाभिमानाला महत्त्व दिले होते बार्टी संस्थेत काम करत असताना आपण समन्वयाची भावना ठेवून एकमेकांना मदत करावी उपेक्षित वंचित शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी आपले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पण भावनेने काम करून जनतेला न्याय द्यावा असे आवाहन करून मा. महासंचालक यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, पुणे डॉ.विकास डावरे , श्रीमती मंजिरी देशपांडे, अॕड बनकर, श्री जीवन गायकवाड, श्रीमती रजनी वाघमारे, श्री अमिर मुलानी, व अन्य कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी, पुणे यांच्या हस्ते श्री विठ्ठल डावरे, डॉ. विकास डावरे, यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी कोरोना नियमाचे पालन करून प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री रामदास लोखंडे यांनी केले .
बार्टी अंतर्गत शासकीय सफाई कामगारांच्या मुला मुलींची निवासी शाळा ,येरवडा पुणे,6 येथील प्रांगणात तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जात पडताळणी समिती पुणे येथील अधिकारी, मुख्याध्यापक श्रीमती जयश्री चेंडके,बार्टी येरवडा येथील अधिकारी व कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?