पक्ष/धर्म/विचारसरणी बाजूला ठेवा आणि वाचा व शेअर करा – आपण आर्थिक, सामाजिक व राजकीय अरिष्टाच्या दारात उभे आहोत!

People’s Research on India’s Consumer Economy (PRICE) या मुंबईस्थित संस्थेने ICE360 या त्यांच्या 2021 मध्ये केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे जाहीर केलेले आहेत. हा सर्व्हे 100 जिल्ह्यातील 120 शहरे, 800 खेडी आणि एकूण 242,000 कुटुंबात केला गेला होता. त्यामुळे या सर्व्हेचे आकडे हे नाकारता येत नाहीत. त्यातले महत्वाचे निरीक्षण असे आहेत –
1) 2016 च्या तुलनेत 2021 मध्ये भारतातील अतिगरीब 20% लोकांचे उत्पन्न 52.6% ने कमी झाले आहे, थोडक्यात निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न झाले. 1995 मध्ये या अतिगरीब 20% लोकांकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा 5.9% वाटा होता, जो 2021 मध्ये फक्त 3.3% इतकाच राहिला आहे.
2) याउलट, 2016 च्या तुलनेत 2021 मध्ये भारतातील अतिश्रीमंत 20% लोकांचे उत्पन्न 39% ने वाढले आहे. 1995 मध्ये या अतिश्रीमंत 20% लोकांकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा 50.2% वाटा होता तो 2021 मध्ये 56.3% इतका वाढलेला आहे.
3) 2016 च्या तुलनेत 2021 मध्ये अतिगरिब 20% लोकांमध्ये शहरी गरिबांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. थोडक्यात, भारतातील शहरे अजूनच बकाल होण्याच्या मार्गावर आहेत आणि तिथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते. शहरीकरणाचा आणि विकासाचा एकूण वेगसुद्धा यामुळे मंदावू शकतो.
4) 2016 च्या तुलनेत 2021 मध्ये देशातील जवळपास 60% लोकांचे उत्पन्न कमी झालेले आहे. बहुसंख्य लोक गरीब होत असताना देश श्रीमंत होवू शकत नाही हे खूप सहज समजण्यासारखे आहे. पहिल्या लॉकडाऊन मध्ये मोदींनी देशातील 80 कोटी गरीब लोकसंख्येला (एकूण लोकसंख्येच्या 60%) मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. PRICE चा सर्व्हे आणि सरकारी घोषणेतील आकडे इथे बरोबर जुळून येतात.
——————————
Oxfam या संस्थेने 2021 मध्ये जागतिक स्तरावर केलेल्या “Inequality Kills” या सर्वेक्षणात भारतासंबंधी दिलेले आकडे तर अजूनच भयावह आहेत. ते खालीलप्रमाणे –
1) 2021 मध्ये 84% कुटुंबांचे उत्पन्न घटले.
2) 2021 मध्ये देशातील अब्जाधीश लोकांची संख्या 102 वरून 142 इतकी वाढली.
3) देशातील तळाच्या 50% लोकांकडे देशाची फक्त 6% संपत्ती आहे. जगभरात आत्यंतिक गरिबीत ढकलल्या जाणाऱ्या लोकांपैकी निम्मे लोक भारतीय आहेत, 2020 मध्ये हा आकडा जवळपास 4.6 करोड होता.
4) शहरी भागात जवळपास 15% बेरोजगारी आहे आणि झालेली एकूण आर्थिक पिछेहाट ही स्त्रियांसाठी अजूनच भीषण आहे.
5) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांतून गरीब आणि मध्यमवर्गीय लोक उत्पन्न कमी होत असतानासुद्धा वाढीव कर भर आहेत, याउलट अतिश्रीमंत लोकांचा करभरणा कमी झाला आहे.
———————————
या सगळ्या काळात 2020 ते 2022 या दोन वर्षात गौतम अदानीची संपत्ती 8.9 अब्ज डॉलरवरून थेट 82 अब्ज डॉलरच्या पार गेली, तर मुकेश अंबानींची संपत्ती 2021 या एका वर्षात 36 अब्ज डॉलरवरून 82 अब्ज डॉलरवर गेली.
थोडा प्रामाणिकपणे आणि डोळसपणे विचार केला तर 60% लोक अधिक गरीब होत असताना आणि दुसऱ्या बाजूला मुठभर अब्जाधीश एकेका वर्षात पाचपटीने अधिक श्रीमंत होत असताना कुठलाही देश आर्थिक, राजकीय व सामाजिकरित्या स्थिर राहू शकत नाही. सरकारने जर वेळीच ही आर्थिक विषमता आटोक्यात आणली नाही तर येत्या 5-10 वर्षात आपला देश भयंकर अरिष्टातून जाणार आहे जिथे इथल्या समस्त राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था कायमच्या नेस्तनाबूत होवू शकतात.
हा देश आज एका आतून धुमसणाऱ्या ज्वालामुखीवर बसलेला आहे हे वास्तव आहे. हे वास्तव नाकारून पुढे जात राहिलो तर सर्वनाश अटळ आहे.
– डॉ. विनय काटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?