आज व्हाट्सअप पाहत असताना कांबळे साहेबांच्या व्हाट्सअप वरील डीपी वर लक्ष गेले तर त्यावर काही तरुण तरुणी हातात पावडे,टोपले घेऊन, चिखलाने माखलेल्या अवस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी दिसले. मनात कुतूहल निर्माण झाले कि नक्कीच काही तरी आगळा वेगळा उपक्रम असेल म्हणून कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असता जे समजले ते ऐकून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती चा व कांबळे साहेबांसारखे मार्गदर्शक मला मिळाले याचा अभिमान वाटला.
काही दिवसापूर्वी मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील महाड येथे हाहाकार उडवला होता. तेथे आलेल्या महापुरामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. महाड पूर्ण चिखलमय झालेले सर्व महाराष्ट्राने बघितले. महाड हे शहर सर्व जगाला वंदनीय आहे कारण येथूनच डॉ. बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 ला मानवमुक्ती च्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. जनावरांना पाणी पिण्याचा अधिकार होता मात्र माणसाला नव्हता. जातीयवादी विकृती च्या छाताडावर भीमप्रहार करून बाबासाहेबांनी महाडाचे चवदार तळे बहुजनांना पिण्यासाठी खुले केले.मात्र मुसळधार पावसाने या ऐतिहासिक शहराला व वास्तूला चिखलमय केले. हे मात्र राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती ला पाहवल्या गेले नाही व त्यांची टीम लगेच तेथे पोहोचली. त्यांनी महाडाचा पूर्ण परिसर लक्ख प्रकाशासारखा स्वछ केला.
*डॉ. बाबासाहेबांनी महाड चा सत्याग्रह करून लोकांच्या मनातील जातीयतेचा चिखल बाहेर काढून मानवमुक्तीचा बिगुल वाजवला व महोत्सव समितीने महाड मधे पुरामुळे झालेला चिखल काढून* तिथल्या गरजूना अण्णधान्य, कपडे, चटई, बिस्कीट, बिस्लरी यासारख्या जीवनावश्यक वस्तू देऊन बाबासाहेबांच्या विचाराचे सच्चे पाईक असण्याचा परिचय दिला. कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनात व मदतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव विचार समितीने 4 दिवस महाड मधेच डेरा टाकून गरजूना 5 टन धान्य चा पुरवठा तसेच *कोणत्याही जाति पातीचा, धर्म पंथाचा विचार न करता जवळपास 1000 कुटुंबाना कपडे, धान्य, लहान मुलांना ड्रेस, मुस्लिम असो वा हिंदु, बौद्ध असो वा आदिवासी सर्वाना समितीच्या कार्यकर्त्यांनी मैत्री भावना व दानपरिमेतून मदत केली*.जवळपास 10-12 गावांना सतत 4 दिवस मदतीचा ओघ सुरु होता. हा खऱ्या अर्थाने फुले, शाहू, बाबासाहेब ह्यांच्या विचाराचा विजय आहे.आपला आदर्श जेवढ्या उच्चकोटीचा तसाच कार्यकर्ता घडत असतो. डॉ. बाबासाहेबाना आदर्श मानणारे कांबळे साहेब व त्यांना आदर्श मानणारे विचार महोत्सव समितीचे कार्यकर्ते यांनी करोना च्या भीषण परिस्थिती त जीवाची पर्वा न करता समाजात माणुसकी व मैत्री भावनेचा जो पायंडा निर्माण केला, तो समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहील, त्यांच्या या कार्यास मानाचा मुजरा.
प्रा. रविंद्र इंगळे, संचालक, बोधिवृक्ष सामाजिक संस्था, अमरावती.