बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार

आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सेक्युरीटी लागते.तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकुन थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकांची गरज लागली नाही. कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी मानसं, जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाडतील, मग मनुवाद्यांची काय बिशाद ?
आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या यौध्दयाचा, त्याच्या पराक्रमाचा परीचय करुन घेऊ. सह्याद्रीच्या कर्याकपार्यात वसलेलं एक छोटंसं गाव,
कोतुळ पासुन तब्बल १४ किलोमीटरवर डोंगराच्या विळख्यात वसलेलं हे गाव #पळसुंदे ,पळसुंद्याच्या मातीचा एक ब्रिटिश कालीन यौध्दा “गेण्बा महार”,म्हणजे #गेणुबाबा_भीमा_संगारे ब्रिटिश कालीन उल्लेख ह्यासाठी की ब्रिटिश अधिकारी सुध्दा नसुटणार्या तीढ्याला सोडवायला गेण्बा महार ह्यांच्याकडे घेऊन येत.४०गाव डांगाणंच काय तर संपुर्ण पंचक्रोशीत ज्याच्या नावाचा दरारा होता.बांधावरच्या तंट्यापासुन ते अगदी विकोपाला गेलेल्या भांडणात जर का न्याय हवा असेल तर लोक “गेण्बा महाराकडं” यायची,गेणुबाबा पण त्याच्या न्यायिक वृत्तीला कधीही भेद जाईल असं वागले नाहीत. तसं वागणं ह्या पठ्ठ्याकडून कधी झालंही नाही. मग अपराधी घरातला का असेना.जातीपातीच्या विषमतेत सुद्धा ह्या महाराचा पंचक्रोशीत असलेला नावलौकीक पाहुण सवर्णांची माथी पेटायची,परंतु काही करणे शक्य नव्हते. आडदांड शरीरयष्टी असलेला पैलवान संपुर्ण जिल्ह्यातील कुस्तीपट्टू जो शीळ (गोलाकार दगड) कधी हलवू शकले नाहीत तो उचलून मानेभोवती गरगरा फिरवायचा,त्याला घेऊन बैठका मारायचा.चार बैलांना सुध्दा ओढताना घाम फुटायचा,असा ढेकळं फोडायचा कुळव एकटा उचलायचा, कुर्हाड हातात आली की एक घाव आणि दोन तुकडे, बैल कसलाही असला तरी दोन शिंग धरली की एकादमात भुईलाच लोळवायचा. मग कोण असल्या बिलंदराच्या नादाला लागेल.पण ह्या ताकदीचा उपयोग त्याने कधी कोणाला त्रास द्यायला केला नही.
ज्याची #तलवार…
दोन्ही बाजूंनी #धारदार…
डाव ज्याचे #असरदार…
#बाबासाहेबांचा #राखणदार…
तोच यौध्दा म्हणजे #गेण्बा_महार…
हा काळ होता १९२० च्या नंतरचा देश स्वतंत्र होणे तर दुर सार्वजनिक पाणवठ्यावर सवर्णांकडून पाणी पिण्याला सुध्दा मुभा नव्हती. बाबासाहेबांनी महाड ला चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून लोकांना स्वत:च्या अस्तीत्वाची जाणीव करुन दिली.मनुवादी विचारसरणीच्या गुढघ्यात मेंदू असलेल्या लोकांचा बाबासाहेबांनी सभासभांतून खरपूस समाचार घेतला. त्यामुळेच त्यांना पावलो पावली धोका होता, तरीही बाबासाहेब थांबले नाहीत.त्यांनी चौदार तळ्याच्या पाण्याला आग तर लावलीच त्याबरोबरच गावोगावी खेडोपाडी दौरे करून कधीही क्रांतीचा विचारही करु न शकणाऱ्या समाजात क्रांतीची पेरणी सुरू झाली. त्यावेळी ते सरकारी वकील होते.अहमदनगरमधील एका देशमुखाचा खटला बाबासाहेबांनी लढावा ह्यासाठी सवर्णांनी खूप प्रयत्न केले परंतु बाबासाहेबांच्या व्यस्त दिनक्रमामधून बाबासाहेब देशमुखांना सहजासहजी भेटणे शक्य नव्हते. अशा वेळी बाबासाहेब कोतुळ मध्ये सभेसाठी यावे असे नियोजन देशमुखांच्या मर्जीतील काही लोकांना हाताशी धरुन सवर्णांनी करण्याचे ठरवले. हि बातमी उडत उडत पळसुंदे गावच्या गेण्बा महार म्हणजेच गेणुबाबा संगारे ह्या महाराच्या काणापर्यंत पोहचली आणि मग हा वाघ चवताळला.गरजला,’माझ्या मुलखात माझा नेता येणार अन जर कोणी बी त्या देवाच्या केसाला धक्का लावला ना तर मग म्हस सोलत्यात तसा जिंदा सोलीन.जर माझ्या बाला धक्का लागला तर मग ह्या गेण्बाचा अन त्याच्या ह्या तब्येतीचा काय उपेग ! असं म्हणून गेण्बानं आड्याला लावलेली त्याची कुर्हाड काढली आणि सज्ज झाला.आपल्या जवळपासच्या पैलवानांची त्यानी एक फौजच तयार केली. त्यावेळी हातात कुऱ्हाड घेऊन उभा असणारा गेण्बा,जणू कर्दनकाळंच भासत होता. लाल लाल डोळे जणू दुश्मनांना आव्हान करत होते. हिम्मत असेल तर या म्होरं !
पण त्याचं ते आक्राळ विक्राळ रुप पाहुन कोणाची मौत आली होती कि जो पुढं येईल.
बाबासाहेब आले म्हंजी एवढा रतीब असलेला माणूस सुदीक तहाण भूक इसरुन त्यांच्या मागं मागं हिंडायचा, जो पर्यंत ते सुखरुप वेशीबाहेर जात नाहीत तोवर. त्यानंतर बाबासाहेब दोन तीन वेळा तालुक्यात आले. कधी शेंडी,कधी कोतुळ बाबासाहेब कुठेही जावो हा गेण्बा पहाडासारखा त्याच्या सहकार्यांसमवेत पाय रोवून त्यांच्या सोबत उभा असायचा. त्याचा दाखला म्हणुन बाबासाहेबांनी अत्यंत विश्वासाने त्यांच्यावर जिल्ह्यातील खजिनदार पदाची जबाबदारी टाकली होती.एखाद्या राजाने वतनदारी बहाल करावी असंच काहीसं गेण्बाला वाटलं असावं. त्यामुळे गेण्बाची पहाडी छाती हातभर अजुन वाढली होती आणि सवर्णांची हातभर फाटली होती.
पुढे काळाराम मंदिर सत्याग्रहात बाबासाहेबांचे हे नायक दादासाहेब गायकवाडांसोबत सहभागी झाले. त्यांनी ब्रिटीश सरकारला जेरीस आणलं होतं. त्यावेळेस अमलदारांना गेण्बाची एवढी धडकी भरली होती की ह्या वादळाला गजाआड डांबण्याशीवाय त्यांच्यापुढं दुसरं गत्यंतर नव्हतं. त्यामुळं ह्या तुफानाला काही काळ कैदेत सुध्दा रहावं लागलं होतं.तब्बल तिन महिन्यानंतर हा वाघ कैदेतून मुक्त झाला.बाबासाहेबांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने त्याची मुक्तता केली.बाहेर येऊन पुन्हा जोमाने चळवळीचं काम सुरु झालं. त्यानंतर गेण्बानं गावागावात जाऊन बाबासाहेबांचा विचार पसरविण्याचे काम सुरु केले.वय हळू हळू अस्ताच्या दिशेने मार्गक्रमण करत होतं.उतारवयात १९९५ नंतर गेण्बा संगारे मुंबईत परळ च्या बेस्टच्या वसाहतीत वास्तव्याला आले.चळवळीतील मुलुख मैदानी तोफ म्हणून नावलौकीक असलेले आमचे आजोबा *शहीद भाई संगारे* ह्यांना चळवळीतील वाट दाखविणारा संगारे घराण्यातील इतिहासातला समाजसेवेचा वारसा हा गेणुबाबांकडूनंच भाईंना मिळाला असावा असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हयात असताना कित्येक विषयांबाबत विचारांची घुसळण हि ह्या चुलत्या-पुतण्यात व्हायची.परंतु काळाने घात केला आणि वयाने कमी असतानासुध्दा १ एप्रिल १९९९ ला भाईंची प्राणज्योत मालवली.त्याचा धसकाच जणू गेणुबाबाने घेतला त्यानंतर फक्त एक वर्षभरातंच वयाचे शतक ठोकूण १०३ वर्ष पुर्ण करनारे सर्वार्थाने शतकवीर ठरलेले गेण्बा महार “गेणबा भिमा संगारे” ह्या यौध्दयाने ८ जुन २००० साली आपला निरोप घेतला.त्यांच्या चळवळीतील हया योगदानामुळे त्यांना भवतु सब्ब मंगलम ह्या सेवाभावी संस्थेकडून २००० साली #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आजही ह्या यौध्दयाची आठवण झाली तर अंगावर शहारे येतात आणि अभिमान वाटतो आपल्या गावच्या मातीचा.जीच्यामधून (गेण्बा महार)
#गेणु_भीमा_संगारे आणि #शहिद_भाई_संगारे ह्यांच्यासारखे निडर वाघ जन्माला आले.
आंबेडकरी विचार असलेल्या गेणु बाबाच्या ह्या कुटुंबातील सदस्य आजही वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, समाजसेवेत लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात.आज गेणु बाबांच्या २१ व्या स्मृतीदिनाच्या निमीत्ताने त्यांच्या निर्भिड देहबोलीला.
बाबासाहेबांचा सहभाग लाभलेल्या एका यौध्दयाला विनम्र अभिवादन.
#पँथर_इज_बॅक_सामाजिक_प्रतिष्ठान
#संस्थापक,
#दलित_पँथर_मुंबई_प्रदेश_अध्यक्ष
✍🏻 #सम्राटभाई_संगारे
आणि समस्त #पँथर_परीवार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?