राज_ठाकरे आणि पुरंदरे प्रेम – पंकज रणदिवे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शिवसेनेमध्ये योग्य स्थान न मिळाल्यामुळे वेगळा पक्ष स्थापन केलेल्या पक्षाचे नेते व संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यांना शिवसेनेमध्ये योग्य स्थान न मिळाल्या मुळे 09 मार्च 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला.त्यांचे चिन्ह रेल्वे इंजिन आहे.त्यांनी नुकताच त्यांचा पक्षाचा झेंडा बदलला असून राजमुद्रा व भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत झेंडा घोषित केला असून त्याला अद्याप निवडणूक आयोगाची मान्यता नाही…. हा झाला #भाग – 1…
राज ठाकरे यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर 2009 साली झालेल्या निवडणुकीत 13 आमदार निवडून आले.नाशिक महानगरपालिका हातात आली.त्यानंतर मात्र त्यांची मोठी घसरण सुरू झाली 2014 साली त्यांचा फक्त 1 आमदार निवडून आला तो ही हल्ली शिवसेनेत आहे.2019 साली त्यांनी काय केले ते आत्ता सर्वांना माहीत आहे.म्हणजे राज ठाकरे स्वतः व त्यांचा मनसे हा हल्ली कुठल्याही सत्ता स्थानी व राजकीय केंद्र स्थानी नाही… हा झाला #भाग – 2…
आत्ता मूळ #भाग – 3…
राज ठाकरे यांनी ABP maza च्या “माझा महाराष्ट्र, माझ व्हिजन ” या कार्यक्रमात मुलाखत घेताना राजीव खांडेकर यांनी महाराष्ट्रात जातीचे राजकारण वाढले आहे का ? या प्रश्नावर उत्तर देतांना जे काही उत्तर दिले त्यावर बोलणं गरजेचे वाटले.नाहीतर राज ठाकरे यांची विधाने करमणूक म्हणून घ्यायची असतात.त्यानी जेम्स लेन चा उल्लेख केला.असाच उल्लेख त्यांनी 01 जून 2021 रोजी लोकसत्ता च्या “लोकसत्ता दृष्टी आणि कोन” या कार्यक्रमात गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत केला.त्यांचे म्हणणे आहे की , ‘ हा कोण कुठला जेम्स लेन ? तो आत्ता कुठे आहे ?’ काही माहीत नाही.मात्र त्याच्या आडून ब्राम्हणांना झोडपण्याचे काम झालेले आहे.’ असाच त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे.आमचेही तेच म्हणणे आहे.कोण आहे हा जेम्स लेन ? त्यांचा उल्लेख आत्ता कोण करत ? जाणून बुजून त्याचे नाव तुम्ही वारंवार का घेत आहात ? त्याच्या आडून तुम्ही पुरंदरेला वाचवायचे प्रयत्न का करत आहात ?
#भाग – 4 ..
आत्ता इथून थोडे मागे जाऊया….
जेम्स लेन नावाच्या परदेशी लेखकाने ‘शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामीक इंडिया’ नावाचे एक पुस्तक लिहिले.त्यासाठी त्याने पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाच्या संस्थेत अध्ययन केले.श्रीकांत बहुलकर या पुण्यातील विद्वानाच्या (?) घरी त्याचे येणे जाणे असायचे.या जेम्स लेन ने त्याच्या पुस्तकात छ.शिवरायांच्या पितृत्वावर शंका घेणारी विधाने केलीत.त्यानंतर महाराष्ट्र भर त्याच्या विरोधात आगडोंब उसळला.संभाजी ब्रिगेड च्या 72 मावळ्यांनी निषेध म्हणून त्याला मदत करणारी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली.त्यानंतर मोठ्या प्रमाणात या विषयाला सुरवात झाली.राज ठाकरे यांचे परमप्रिय बाबासाहेब पुरंदरे यांनी या पुस्तकाचा चांगला संदर्भ ग्रंथ म्हणून गौरव केला.तर 07 सप्टेंबर 2003 साली दै.सामना मध्ये अनंत देशपांडे ने या पुस्तकाचे गोडवे गाणारे परीक्षण लिहिले.तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेत होते.काही शिवसैनिकानी प्रामाणिकपणे जेम्स लेन ला मदत केली म्हणून श्रीकांत बहुलकर च्या तोंडाला काळे फासले.मात्र नंतर याच राज ठाकरे यांनी शिवसैनिकांची बाजू न घेता बहुलकरची बाजू घेतली व त्याची माफी मागितली.जेम्स लेन ने लिहिलेल्या प्रकार इतका घृणास्पद होता की त्याचा निषेध महाराष्ट्र भर होत असताना राज ठाकरे, त्यांच्या बाबा पुरंदरे नामक गुरुला व समस्त एक विचारी लोकांना त्या गोष्टीचा निषेध करू वाटला नाही ? शिवरायांच्या पितृत्वावर शंका घेणारी घटना यांना राजकीय फायदा घेणारी घटना वाटते ? या जेम्स लेन चा उल्लेख राज ठाकरे वारंवार का करत आहेत? आम्ही जेम्स लेन ही प्रवृत्ती मानतो.ती अधून मधून बर्याच जणांच्या डोक्यातून बाहेर येत राहते.तिला ठेचावेच लागते.
#भाग – 5
ABP maza ला काल दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सॉफ्ट हिंदुत्वचा प्रचार केला.त्यांनी त्यांचा भविष्यातील विचार बोलून दाखवला.विकास वगैरे व पुरोगामित्व ही त्यांनी पांघरलेली झुल आहे हे मी वारंवार सांगितले आहे.लिहिले आहे.19 एप्रिल 2019 रोजी मी ‘ राज ठाकरे यांच्या भाषणापलिकडील पक्ष विस्तार ‘ या लेखात सविस्तर लिहिले आहे.काल मोदी शहा ला शिव्या देणारे राज ठाकरे शरद पवार सोनिया गांधी यांना शिव्या देणारच नाहीत याची कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही.राज ठाकरे यांच्या बोलण्यात तर विसंगती आहेच मात्र त्यांच्या कृती मध्ये सुद्धा विसंगती आहे.त्यामुळे लोक त्यांना फक्त चांगला भाषण करतो म्हणून एकतात.सभांना गर्दी करतात.मात्र मतदान करत नाहीत.
राष्ट्र या संकल्पनेबद्दल बोलतांना ते राष्ट्रवाद बोलतात मात्र मनसे च्या मराठी या मुद्यावर जेव्हा येतात तेव्हा त्यांचा राष्ट्रवादाचा बुरखा गळून पडतो.राम मंदिराच्या मुद्यावर अप्रत्यक्ष पणे बोलतात.समाजाच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेष होता तो समाजात होता म्हणून राम मंदिर सारखी कृती घडली असे ते मांडतात.आम्ही जात मानत नाहीत मग धर्म मानता का ? असाही एक सवाल त्यातून उभा राहतो.त्यांच्या भूमिका कायम बेगडी असतात.
महाराष्ट्रात राहून त्यांना पुरुषोत्तम खेडेकर माहीत नाहीत.म्हणजे त्यांना मराठा सेवा संघ माहीत नाही.मराठा – कुणबी समाजात तसेच समस्त बहुजन समाजात मराठा सेवा संघाने काय योगदान दिले आहे.हे महाराष्ट्रातील हरेक माणसाला माहीत आहे.मात्र ते सोयीस्कर पणे माहीत असूनही न माहीत असल्यासारखे करतात.त्यांना नेहमी पुरंदरे बद्दल प्रचंड प्रेम वाटत आलेले आहे. आत्ता तर पुरंदरे त्यांना देवच वाटतात.मात्र पुरंदरे ने जी शिवचरित्रात ब्राम्हणी घुसखोरी केलेली आहे.तिच्या विरोधात महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.डॉ.आ.ह.साळुंखे सारख्या विख्यात संशोधक व लेखकांनी पुरंदरे चे बेगडी शिवप्रेम दाखवून दिलेले आहे.पुरंदरेला छ.शिवराय ‘मानव प्रतिपालक’ नको आहेत तर ‘ब्राम्हण प्रतिपालक’ पाहिजे आहेत.जे पुरंदरेला हवे आहे तेच तुम्हाला हवे आहे.त्यामुळे तुमच्या डोक्यातले ‘ब्राम्हणी सडके’ विचार असे बाहेर पडत राहतात.त्या विकाराला ओळखण्याची क्षमता आम्हाला मराठा सेवा संघ व पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिलेली आहे.त्यामुळे तुम्ही जरी पुरुषोत्तम खेडेकर यांना ओळखत नसले.तरी हा महाराष्ट्र त्यांना ओळखतो.मराठा आरक्षण मिळणार नाही असे ते मुलाखतीत म्हणतात.आमचे म्हणणे असे आहे की,आम्ही सिद्ध करून दाखवतो मराठा आरक्षण कसे मिळेल. तुम्ही सिद्ध करून दाखवा आरक्षण कसे मिळणार नाही…
विविध राजकीय झुल्यांवर झुलण्याची सवय राज ठाकरे यांनी बंद करावी.नाहीतर पुरंदरे व जेम्स लेन च्या बिदागीवर फक्त त्यांना टाळ्याच मिळतील मते नाही.
— पंकज मधुकर रणदिवे.
वक्ता,लेखक,ब्लॉगर,
प्रवक्ता, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद,
महाराष्ट्र राज्य.
8600073161, 9834993421.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?