लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतिकारक चहा…

कोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते. जेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ #गडबड उडाली.
तिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील घोड्याच्या पागेतील #मोतद्दारास हौद बाटवला म्हणून हातात चाबूक घेवून पाठ फोडून काढत होते. त्यांनी गंगारामांस रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला. तसं पाहिलं तर १९१९ साली शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर #हुकूम काढला होता. महाराजांचं या संदर्भातलं धोरण माहीत असूनही त्यांच्या संस्थानात ही घटना घडली होती.
हे सर्व घडत असताना महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. ते दिल्लीहून येण्याची गंगाराम वाट पाहात होते. महाराज कोल्हापूरला आले. त्यांचा मुक्काम कोल्हापूर शहराबाहेरील #सोनतळी इथं होता. महाराज आल्याचं कळताच गंगाराम अस्पृश्य बांधवांसह महाराजांना जाऊन भेटले आणि झालेला सर्व प्रकार हुंदके देत महाराजांपुढं कथित केला.
गंगाराम कांबळेंवर झालेल्या अत्याचाराची कथा ऐकून महाराजांच्या डोळ्यात अंगार फुलत होता. ताबडतोब त्यांनी गंगाराम कांबळेंना ज्यांनी मारलं त्यांना बोलावलं आणि स्वतःच्या हातात घोड्याची #कमची घेऊन त्यांच्या पाठी फोडून काढल्या. हे करत असताना हा मराठा आहे, असा विचार त्यांनी केला नाही आणि गंगाराम यांच्या समोर त्यांना शिक्षा दिली.
अस्पृश्यांनी वरच्या दर्जाच्या लोकांप्रमाणे काही व्यवसाय करणे हे त्या काळच्या समाजाला पचणारं नव्हतं. तरीही शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांची नोकरी माफ करत स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मार्ग खुला केला. पुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर ‘#सत्यसुधारक_हॉटेल‘ सुरू केलं.
दुकान तर सुरू झाले पण महाराच्या हातचा चहा कोण पिणार, गंगारामला काय करावे सुचेना शेवटी ही गोष्ट महाराजांन पर्यंत गेली त्यावर महाराजांनी एक युक्ती काढली. दररोज शाहु महाराजांची घोडागाडी गंगारामच्या दुकानपुढे थांबु लागली, महाराजांच्या गाडीत वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असायचे व महाराज त्यांना घेवून दुकानात यायचे व आपल्या भरदस्त आवाजात चहा मागवायचे, “गंगाराम सर्वांना #फक्कड चहा आण”… स्वतःहा महाराज चहा पिताना दिसल्यावर बाकीच्यांना तो #निमूटपणे प्यायला लागे, एवढेच नाहीं तर ज्यांना कुणास सरकारी कागदपत्रावर सही हवी असेल तर सकाळी “सत्यसुधारक” मध्येच येणे असा नियमचा महाराजांनी पाडला. त्यामुळे सकाळी दुकानावर प्रचंड गर्दी व्ह्यायची महाराज गंगारामने केलेला चहा पाजायचे आणि मगच #सही करायचे अशी होती राजर्षी शाहू महाराजांची सत्यशोधक चळवळ..
शाहू महाराज १९२० मध्ये नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेला अध्यक्ष म्हणून गेले होते. यात त्यांनी मुद्दामच अस्पृश्य व्यक्तीच्या #हातचा चहा घेतला होता. पुढच्याच महिन्यात #नाशकात अस्पृश्य वसतिगृहाच्या पायाभरणी समारंभासाठी गेले होते. इथं त्यांनी शेकडो लोकांच्या समोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला. याचीच पुनरावृत्ती त्यांनी तासगावला केली होती.
शिवाजी महाराजांच्या वंशजानं त्याकाळात कर्मठ समाजासमोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचं अन्नपाणी घेणं, हा शाहू महाराजांनी दिलेला एक क्रांतिकारक संदेश होता. शाहू महाराजांनी समाजाला #दुभंगीत करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा आणि व्यवस्थांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा, त्यांना मानवी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. उदात्त मानवी जीवन उभारण्याची त्यांची एक खास शैली होती. ती कधी सडेतोड, कधी #मुत्सद्देगिरीची, कधी #अपरंपार प्रेमाची, कधी #प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणारी तर कधी #मिश्किलपणे धडा शिकवणारी होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?