तु खऱ्या लोकशाहीचा | Tu Kharya Lokshahicha song lyrics

Sung & Music by Keshav Khobragade,

Lyrics Prakash More

तु खऱ्या लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा
शोषित पिढीत जनतेचा…२
आवाज उठविला भीमा

तु खऱ्या लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा
शोषित पिढीत जनतेचा…२
आवाज उठविला भीमा

तु खऱ्या लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा…२
माणूस असूनी जगलो आम्ही लाचारीचे जिने…
हा न्याय मिळाला बाबा…२
आम्हास तुझ्या घटनेने
तु लढला आमुच्यासाठी…२
अन्याय मिटविला भीमा
तु खरा लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा…२

आयुष्य झिजविले सारे तु मानवतेच्या साठी…२
केलीस खुली तु दारे…२
साऱ्यांना शिकण्यासाठी
आम्हा दुध वाघिणीचे तु…२
दिले पिण्यास भीमा
तु खरा लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा…२

लखलखती किरणे आता प्रत्येक झोपडीवरती…२
त्या क्रांतीसूर्यासंगे…२
बघ जुळली आमची नाती
बघा दुर क्षितिजावरती…२
लाली तु गवला भीमा
तु खरा लोकशाहीचा इतिहास घडविला भीमा…२