सुखं मिळेल बुद्ध विहारत | Sukha Milel Buddha Viharat Song Lyrics

माहिती तपशील
गाण्याचे नाव (Song Name) सुखं मिळेल बुद्ध विहारत
गायक (Singer) आनंद शिंदे
गीतकार (Lyricist) मुकेश सोनवणे
संगीत (Music) हर्षद शिंदे
अल्बम (Album) कायदा भीमाचा

सुखं मिळेल बुद्ध विहारत
का गं देवाला पूजतेस घरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात

चुकली कातू धम्माची वाट
अडवळनाचा चढते का घाट
यादेवांनी लावलिय वाट

कशाला त्यांचा करायचा थाट
नको धडपडू अशी अंधारात
सुखं मिळेल बुद्ध विहारात

देविदेवतांची नको ती भाषा
त्यांनीच केली आपली निराशा
अंधश्रद्धेची मनात आशा

घरदाराचा होईल तमाशा
नको आणून घेऊस उरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात

त्रीसरणाचे कर पालन तू
पंचशीलेला रोज म्हण तू
तथागताचे कर स्मरण तू

भीमबाबाचे धर चरण तू
बुद्ध वंदना म्हणावी सूरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात

शांति सुखा देवरदान
दाविला बुद्ध भीमरायान
त्या तत्वाच कर आचरण

जगात तुजला मिळेल मान
सांगे मुकुंद नको ही वरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात

का गं देवाला पूजतेस घरात
सुखं मिळेल बुद्ध विहारात…